supriya sule 
देश

NCP 'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा! सुप्रिया सुळेंचे PM मोदींना आव्हान

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. राष्ट्रवादी पार्टीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावीच, माझ्या पक्षाचा या चौकशीला पूर्ण पाठिंबा राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. या भाषणाची संधी घेत खासदार सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार करताना पंतप्रधान मोदींनी एनसीपी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी असे संबोधले होते. तसेच काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात एका जाहीरसभेत बोलताना एनसीपीने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर काही दिवसानंतरच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

या आरोपांचा संदर्भ देत खासदार सुळे म्हणाल्या, पंतप्रधानांनी केलेल्या या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. माझ्या पक्षाचा या चौकशीला संपूर्ण पाठिंबा राहिला. आता चौकशीच करून घ्या, असे आव्हान दिले. या आव्हानाचे एनसीपीच्या इतर सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

शिक्षणात भेदभाव- अरविंद सावंत

गेल्या 75 वर्षात देशाने अनेक प्रगती केली आहे. परंतु अद्यापही शिक्षणात भेदभाव आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे शालेय अभ्यासक्रम असल्याने त्यांच्या प्रगतीमध्ये फरक राहतो, हे बदलण्याची आवश्यकता आहे. देशाने उच्च शिक्षणावर जितका भर दिला. तेवढा प्राथमिक शिक्षणावर भर दिला नाही. तो देण्याची गरज आहे. त्यानंतरच शिक्षणातील भेदभाव कमी होण्यास मदत होईल, असेही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT