INS Imphal warship to be commissioned today strengths features marathi news  
देश

INS Imphal : शत्रूंना धडकी भरवणारी INS इम्फाळ नौदलात होणार दाखल; ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी आहे सुसज्ज

हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ मंगळवारी भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील होणार आहे.

रोहित कणसे

भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडणार आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ मंगळवारी (26 डिसेंबर) भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील होणार आहे.

विशेष म्हणजे आयएनएस इम्फाळ ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे. तसेच ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. एप्रिल 2019 मध्ये राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचा सैन्यदलात समावेश करण्यात येणार आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या समृद्धीसाठी ईशान्येकडील राज्यांचे महत्त्व यातून स्पष्ट होते. या जहाजाचे वजन 7,400 टन असून एकूण लांबी 164 मीटर आहे. ही युद्धनौका कजमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जहाजविध्वंसक क्षेपणास्त्रे आणि टॉरपीडोने सुसज्ज आहे.

आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात यशस्वी चाचणी

आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात दीर्घ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच 20 ऑक्टोबर रोजी आयएनएस इम्फाळला भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर या जहाजाने गेल्या महिन्यात विस्तारित पल्ल्याच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. कोणत्याही स्वदेशी युद्धनौकेला नौदलात सामील करण्यापूर्वी अशा प्रकारची ही पहिलीच चाचणी होती. या चाचणीतील यशामुळे भारतीय नौदलाचे मनोबल नक्कीच वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT