INS Jatayu 
देश

INS Jatayu: मालदीवला पर्याय मिळाला? 130 किलोमीटर अंतरावर उभा राहतोय 'जटायू' नौदल तळ

Naval Base in lakshadweep: मालदीव भारतापासून दूर जात आहे. अशात चीनचा प्रभाव मालदीवमध्ये वाढत असल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताचा शेजारी मालदीव हा चीनच्या जवळ जात आहे. मालदीवमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये मुइझ्झू हे अध्यक्ष झालेत. अपेक्षेप्रमाणे ते चीनचे गोडवे गात आहेत. चीन देखील त्यांचा भरपूर फायदा करुन घेत आहे. सत्तेत येताच मुइझ्झू यांनी भारत सरकारने सैन्य परत बोलावून घेण्याची विनंती केली होती. (INS Jatayu Maldives got option At a distance of 130 km stands Naval Base in lakshadweep)

मालदीव भारतापासून दूर जात आहे. अशात चीनचा प्रभाव मालदीवमध्ये वाढत असल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. मालदीव हा हिंद महासागरातील महत्त्वाचा देश आहे. अनेक मालवाहतूक जहाजे याठिकाणी थांबत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने मालदीवचे महत्व खूप आहे. याच दृष्टीने भारताने मालदीवच्या जवळ एक नौसेनेचे तळ उभे करण्यास सुरुवात केली आहे.

भारत हिंद महासागरामध्ये आपली सैन्य स्थिती वाढवण्यासाठी आणि आपली शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच कारणासाठी भारतीय नौसेनेने बुधवारी लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर एक नवा तळ 'आयएनएस जटायू'ची उभारणी सुरु केली आहे. या तळामुळे लक्षद्वीपच्या क्षमता आणखी वाढणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तळ मालदीवपासून खूप जवळ आहे. मालदीवपासून लक्षद्वीपमधील हे तळ १३० किलोमीटर अंतरावर आहे.

अरबी समुद्रातील चाचेगिरी आणि ड्रग्स तस्करीला आळा घालण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने या नव्या तळाचा फायदा होणार आहे. नौसेना प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी एका कार्यकर्मात या नव्या स्थळाचे उद्घाटन केले आहे. तळाचे नाव देखील खास आहे.

आयएनएस जटायू

हिंदू महाकाव्य रामायणामध्ये एक मोठ्या आकाराचा पक्षी होता. त्याचे नाव जटायू होते. जेव्हा रावण सीतामाईचे अपहरण करुन तिला लंकेकडे घेऊन जात होता. त्यावेळी जटायूने त्याला विरोध केला होता. जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, रावणासमोर त्याला फार काही करता आले नाही. या संघर्षात जटायूचा मृत्यू झाला होता. जटायूच्या नावावरुन तळाचे नाव ठेवण्यात आले आहे.

मिनिकॉयमध्ये नौसेनेसाठी एक तात्पुरत्या स्वरुपाचे तळ होते. पण, आता याला कायम स्वरुपात ते विकसित केले जात आहे. हरि कुमार म्हणाले की, हे तळ सुरु होणे देशाच्या सुरक्षेसाठीच नाही तर हिंद-प्रशांत महासागरातील भारताच्या स्थितीला मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहे. मिनिकॉय हे लक्षद्वीपच्या दक्षिणेकडील बेट आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT