INS Vikrant New naval Ensign Sakal
देश

INS Vikrant: नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण; महाराष्ट्राची छाती ५६ इंच फुलली!

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या उद्घाटनावेळी केरळमधल्या कोचीमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी आपण गुलामीतून मुक्त झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या ध्वजाचं छत्रपती शिवाजी महाराजांशीही एक खास कनेक्शन आहे. (INS Vikrant)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. हे करत असताना त्यांनी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला होता. मात्र जुन्या ध्वजामध्ये तिरंग्याऐवजी युनियन जॅक लावण्यात आला होता.

स्वातंत्र्यानंतर म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतीय सुरक्षा दलांनी ब्रिटीश कालीन ध्वजच पुढे ठेवले होते. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा या ध्वजामध्ये बदल झाले. त्यामध्ये युनियन जॅकऐवजी तिरंगा लावण्यात आला होता. सेंट जॉर्ज यांचा रेड क्रॉस मात्र तसाच होता. त्यानंतर ठराविक काळानंतर दोनवेळा या ध्वजात बदल करण्यात आले. २०१४ मध्ये या ध्वजामध्ये सत्यमेव जयते ही ओळही लिहिण्यात आली होती.

या नव्या ध्वजामधून मात्र ब्रिटीशांच्या सर्व खुणा हटवण्यात आल्या आहेत. आता या ध्वजावर संपूर्णपणे भारतीय छाप असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. हा नवा ध्वज आपण भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. भारतीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत हा नवा ध्वज सेनेचं आत्मबल आणि आत्मसन्मानाला नवी उर्जा देईल, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT