PM Narendra Modi esakal
देश

INS Vikrant : 'विक्रांत' केवळ युद्धनौका नाहीय, भारताच्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे : नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाला सुपूर्द केली.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाला सुपूर्द केली.

INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) नौदलाला सुपूर्द केली. आयएनएस विक्रांतची खास गोष्ट म्हणजे, ती स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. 2009 मध्ये बनवायला सुरुवात झाली. आता 13 वर्षांनंतर ती नौदलाला (Navy) मिळाली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या नवीन चिन्हाचं अनावरण केलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, आज इथं केरळच्या किनारपट्टीवर प्रत्येक भारतीय एका नवीन भविष्याचा सूर्योदय पाहत आहे. आयएनएस विक्रांतबाबत होणारा हा कार्यक्रम म्हणजे, जागतिक क्षितीजावर भारताच्या उत्साहाचा जयजयकार आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौका नाहीय. 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे, असं मोदी म्हणाले.

महासागरी आव्हानं अनंत असतील तर भारताचं उत्तर फक्त 'विक्रांत' असेल. विक्रांत हे स्वातंत्र्याच्या अमृताचं अतुलनीय अमृत आहे. विक्रांत हा भारताच्या स्वावलंबी होण्याचं अनोखं प्रतिबिंब आहे. आज भारत जगातील त्या देशांमध्ये सामील झाला आहे, जे स्वदेशी तंत्रज्ञानानं एवढी मोठी विमानवाहू युद्धनौका तयार करतात. आज आयएनएस विक्रांतनं देशात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान पुढं म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी या सागरी शक्तीच्या बळावर अशी नौदल उभारली. त्यामुळं शत्रूंची झोप उडाली होती. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापार याची भीती वाटायची. म्हणूनच, त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचं कंबरडं मोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजं आणि व्यापार्‍यांवर किती कडक निर्बंध लादले गेले, याचा इतिहास साक्षीदार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT