INC Vikrant esakal
देश

INS Vikrant : आयएनएस विक्रांत या शस्रास्त्र अन् फायटर प्लेनने असेल सज्ज

सकाळ डिजिटल टीम

हायलाइट्स

  • बनवण्यास २० हजार कोटी लागले.

  • पहिल्या विमान वाहक विक्रांतवरून ठेवले नाव

  • विक्रांतवर एकावेळी २० फायटर प्लेन तैनात होऊ शकतात.

INS Vikrant : पहिल्या स्वदेशी विमान वाहक युध्दनौका आयएनएस विक्रांतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलास सोपविण्यात आले. ही भारतीय इतिहासातली आजवरची सर्वात मोठी युध्दनौका आहे. आयएसी विक्रांत हिंद-प्रशांत आणि हिंदी महासागर या क्षेत्रात शांती आणि सुरक्षेसाठी कार्यरत असेल. यावर फायटर प्लेन उतरवण्याचे परिक्षण नोव्हेंबरपासून सुरू होईल व २०२३ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. मिग-२९चे जेट विमान पहिले काही वर्ष युध्दनौकेवरूनच संचलित होतील

हे स्वदेशी विमानवाहू जहाज, भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाइन केले आहे. आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे. त्याचे नाव त्याच्या भारताच्या पहिल्या प्रख्यात विमानवाहक 'विक्रांत' च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. १९७१ च्या युद्धात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

सुरक्षा क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भर्तेच्या दिशेने पहिले पाऊल

आयएनएस विक्रांतचे नौदलात असणे हे सुरक्षा क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भर्तेच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरणार आहे. विमान वाहक स्वदेशी युध्दनौका बनवण्याची क्षमता असणाऱ्या अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन व फ्रांस या देशांच्या यादीत आता भारताचापण समावेश झाला आहे. भारत सरकारच्या Make In India चे हे ठळक उदारपण ठरणार आहे. आयएनएस विक्रांतचे नौदलात पदार्पण झाल्यानो आता नौदलात दोन युध्दनौका झाल्या असून त्या देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

विक्रांवर तैनात होतील २० फायटर प्लेन

हे स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (HAL) व हलक्या युध्द विमान (LCA) यांच्याशिवाय मिग-२९चे फायटर जेट, कामोव-३१ व MH-६०R बहु-भूमिका असलेल्या हेलिकॉप्टरसह 30 विमानांचा समावेश असलेले हवाई विंग हाताळण्यास सक्षम असेल. यावर ३० एअर क्राफ्ट तैनात होतील. ज्यात २० फायटर विमान व १० हॅलिकॉप्टर असतील. भारत आता सैन्य क्षमतेत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. नौदलाच्या दृष्टीने विचार केला तर भारताकडेपण आता चीनसारखेच दोन एयरक्रॉफ्ट कॅरियकर आहेत.

भारताच्या सूरक्षेच्यादृष्टीने आयएनएस विक्रांत फार महत्वपूर्ण

याद्वारे हिंदी महासागरात चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल स्ट्रॅटेजीला तडा जाऊ शकतो. स्ट्रिंग ऑफ पर्ल स्ट्रॅटेजी अंतर्गत चीन भारताभोवती आपल्या नौदल तळांचा चारही बाजूंनी तळ उभारत आहे. त्याच वेळी, याद्वारे त्याला आशिया पॅसिफिक क्षेत्रातून व्यापार नियंत्रित करायचा आहे. त्यासाठी ते दक्षिण आशियातील छोट्या देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नौदल तळ उभारत आहेत.

यामध्ये तो बांगलादेश, म्यानमारमध्ये नौदल तळ उभारण्यासाठी मदत करत आहे. याशिवाय चीन मालदीवमध्ये भारताच्या अगदी जवळ एक कृत्रिम बेटही बांधत आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी लीजवर घेतले आहे. ते पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचा नौदल तळ म्हणून विकास करत आहेत. चीनच्या या रणनीतीला तोंड देण्यासाठी भारताचा आयएनएस विक्रांत खूप प्रभावी ठरू शकतो हे उघड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT