A still from a viral video showing insects found in Tirupati Balaji's prasad, sparking debate about hygiene and food safety in religious offerings. Esakal
देश

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Insect in curd rice at Annadana Center in Tirumala: दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे भक्ताने आरोप केले. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आशुतोष मसगौंडे

तिरुपती मंदिरातील प्रसादाचा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने प्रसादात किडे सापडल्याचा दावा केला आहे.

दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे भक्ताने आरोप केले. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

वारंगलचे रहिवासी भक्त चंदू यांनी सांगितले की, बुधवारी प्रसाद घेण्यासाठी ते दुपारच्या जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रसादात किडे आढळले. ही घटना बुधवारी घडली. त्यांनी सांगितले की, दही भातामध्ये किडे होते. मात्र, मंदिर प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे.

आपला अनुभव सांगताना एक भक्त म्हणाला, “माझं नाव चंदू आहे आणि मी वारंगलहून दर्शनासाठी आलो होतो, पण जेवताना मला दही भातामध्ये एक किडा सापडला. मी मंदिरातील कर्मचाऱ्याला हे सांगितले तेव्हा तो म्हणाला 'असे कधी कधी होते.' याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी चंदू आणि इतर भाविकांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनात बदल होऊनही अशाच समस्या कायम असल्याचे सांगत चंदू यांनी सरकारने कठोर कारवाई अशी मागणी केली.

या प्रकाराणामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी याच मंदिरातील प्रसाद लाडू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आल्याचा आरोप झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT