Delhi Crime 
देश

Sultanpuri Accident: चार पोलीस ठाण्यांसमोरुन गेली कार; 'ती' मात्र रस्त्यावर फरफटत राहिली!

रस्त्यावर पोलिसांची पेट्रोलिंग करणारी एकही गाडी नसल्यानं संताप व्यक्त होतं आहे. नेमकं काय घडलंय वाचा...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत एका २० वर्षीय तरुणीची स्कुटी धावत्या कारला अडकून सुमारे तासभर फरफटत गेल्यानं मृत्यू झाला. देशाच्या राजधानीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पण आता या घटनेमधील एक धक्कादायक अँगल समोर आला आहे. (Inside details of horrific Sultanpuri accident car passed through 4 police stations who dragged girl body)

टाइम्सनाऊच्या वृत्तानुसार, ही तरुणी मदतीसाठी हाक देत होती, पण तिच्या मदतीसाठी कोणीही धाऊन आलं नाही. ज्या कारनं तिला तब्बल १३ किमीपर्यंत फरफटत नेलं ती कार चार पोलीस स्टेशनसमोरुन गेली. सुल्तानपुरी, विजय विहार, बवना आणि कांझवाला या चार पोलीस स्टेशन्ससमोरुन या महिलेला फरफटत नेण्यात आलं. पण पोलिसांनाही ही घटना दिसली नाही याचं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ज्या मार्गावर ही भयानक घटना घडली त्या मार्गावरील चारही पोलीस स्टेशन्सना प्रत्येकी चार ते पाच पीसीआर व्हॅन्स असतात. याचाच अर्थ असा की, या मार्गावर किमान २५ पोलीस व्हॅन्स पेट्रोलिंग करताना असायला हव्यात. यावर पोलिसांचं म्हणणं आहे की, या दिवशी जास्तीत जास्त पोलीस फोर्स ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या निमित्त रात्रीच्या सेलिब्रेशन ठिकाणांवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

माझ्या मुलीला न्याय द्या; पीडितेच्या आईची आर्त हाक

या दुर्घटनेत पीडित मुलीवर जर अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालानंतर समोर आलं तर आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होईल. पण तिच्या मृतदेहावर त्वचा, हात-पाय असं काहीही राहिलेलं नाही, असं पोलिसांनी म्हटलंय पण माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, अशी आर्तहाक पीडितेच्या आईनं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT