देश

‘रेल सायकल’वरून लोहमार्गांची तपासणी; रेल्वेने कर्मचाऱ्यांसाठी आणले नावीन्यपूर्ण साधन

पीटीआय

भुवनेश्‍वर - लोहमार्गांची दैनंदिन पाहणी, तपासणी व दुरुस्तीसाठी रेल्वे कर्मचारी आता सायकलचा वापर करणार आहेत. यासाठी भारतीय रेल्वेने वैशिष्टपूर्ण ‘रेल सायकल’ तयार केली आहे, अशी माहिती पूर्व तटवर्ती रेल्वे विभागाने (ईसीओआर) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी (ता.२६) दिली. सध्या या कामांसाठी रुळावरून जाणाऱ्या छोट्या ढकलगाडीचा ( रेल्वे डॉली) वापर केला जात आहे. ‘ईसीओआर’च्या खुर्दा विभागातील ‘पर्मनंट वे (पी-वे) या केंद्रात ती नावीन्यपूर्ण रेल सायकल तयार केली आहे. 

रेल सायकलची वैशिष्ट 
- रुळांवर सायकलचा तोल सांभाळण्यासाठी नादुरुस्त रेल्वे डॉलीच्या चाकांचा वापर. 
- कमाल वेग ताशी १५ किलोमीटर 
- वजन फक्त ३० किलो. 
- हलक्या वजनामुळे सहज उचलता येते. 
- सुटे भाग करून जोडणी करणे शक्य. 

उपयुक्तता 
१) सध्या तपासणीसाठी कर्मचाऱ्याला पायपीट करावी लागते. 
२) रेल सायकलमुळे लोहमार्गांची तपासणी व निरीक्षण (विशेषतः पावसाळ्यात) सहज करण्यास मदत. 
३) पाऊस काळ, मार्गातील पूल आणि काही असुरक्षित ठिकाणी कर्मचाऱ्याला कमी वेळेत पाहणी करता येणार. 
४) पावसामुळे येणारे पाहणीत येणार अडथळे दूर होणार 
५) उन्हाळ्यात गस्त घालणे शक्य होणार 
६) कोरोनामुळे सध्या बंद असलेल्या लोहमार्गांवर गस्त घालून रुळांची सुरक्षितता तपासता येणार 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT