Auto Ambulance Sakal
देश

Inspirational Story: हरजिंदर सिंग; ५ दशकांपासून चालवतायत मोफत अँब्युलन्स ; वाचवले शेकडो जीव

पाच दशकांहून अधिक काळ तो ऑटोरिक्षा चालवत आहे, पण त्याला वाहतूक पोलिसांनी कधीही अडवले नाही किंवा एकदाही त्याला दंड ठोठावला आहे.

वैष्णवी कारंजकर

हरजिंदर सिंग यांची ऑटोरिक्षा ही दिल्लीच्या रस्त्यावर धावणाऱ्या शेकडो हिरव्या आणि पिवळ्या ऑटोरिक्षांपैकी एक आहे. त्यांची ऑटोरिक्षा बाहेरून हुबेहुब इतर ऑटोरिक्षांसारखी दिसते पण वेगळी आहे. या ऑटोरिक्षावर एक खास संदेश लिहिला आहे. ते त्यांच्या रिक्षामध्ये प्रथमोपचार किट ठेवतात ज्यामध्ये बँडेज, औषधे, बर्न क्रीम, अँटीसेप्टिक लोशन इत्यादी असतात. 80 वर्षीय हरजिंदर सिंग गेल्या ५ दशकांपासून दिल्लीत मोफत ऑटो अँब्युलन्स चालवत आहेत.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हरजिंदर सिंग १९६४ पासून दिल्लीच्या रस्त्यावर ऑटोरिक्षा चालवत आहेत. याआधी ते ट्रॅफिक वॉर्डन होते. ते ऑटोरिक्षा युनियनचे सरचिटणीसही राहिले आहेत. पाच दशकांहून अधिक काळ ते ऑटोरिक्षा चालवत आहे, पण त्याला वाहतूक पोलिसांनी कधीही अडवले नाही किंवा एकदाही त्यांना दंड ठोठावलेला नाही.

हरजिंदर त्यांचा मोठा मुलगा आणि त्यांच्या कुटुंबासह दिल्लीतील भजनपुरा येथे राहतात. ते सकाळी ८ वाजता कामावर निघतात. रस्त्यावर ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही मदत करतो.

हरजिंदर सिंग यांना शहरात आलेल्या पुरामुळे दिल्लीच्या रस्त्यावर मोफत ऑटो अँब्युलन्स चालवण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पूरग्रस्त भागात मदत दिली. पुराचा कहर संपला पण हरजिंदर यांनी आपली सेवा सुरूच ठेवली. हरजिंदर सांगतात की याच सुमारास त्यांनी मोफत ऑटो अँब्युलन्स सेवा सुरू केली.

हरजिंदर त्यांच्या ऑटोरिक्षा उर्फ ​​मोफत ऑटो अँब्युलन्समध्ये आवश्यक औषधे घेऊन जातात. या ऑटोमध्ये दानपेटीही बसवण्यात आली आहे. ते प्रवाशांना देणगी देण्याचे आवाहन करत नाहीत, लोक जे काही देणगी देतात ते ते स्वेच्छेने स्वीकारतात. हरजिंदर दान केलेल्या पैशातूनच औषधे खरेदी करतात. हरजिंदरचे वय खूप झाले असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार असल्याचे ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT