ramna sakal
देश

हैदराबाद येथे लवकरच आंतरराष्ट्रीय 'लवाद' केंद्र

हैदराबाद येथे लवकरच आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (आयएसी) सुरू होणार असल्याची माहिती आज सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : हैदराबाद येथे लवकरच आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (आयएसी) सुरू होणार असल्याची माहिती आज सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली. या लवाद केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यास मदत मिळणार आहे. यासंदर्भात ट्रस्ट डिड नोंदणी करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी सरन्यायाधीश रमणा यांनी माहिती दिली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हिमा कोहली, कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनीही न्यायधीश, मंत्री के.टी. रामराव आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.

आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे स्वप्न तीन महिन्यात पूर्ण होत असल्याचे सरन्यायाधीश रमणा म्हणाले. इतक्या लवकर लवाद केंद्र कार्यान्वित होईल असे वाटले नव्हते, परंतु याबद्दल राज्य सरकारचे आपण आभार मानतो. लवाद केंद्र सुरू होणे हे हैदराबाद आणि तेलंगण राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरेल. या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय वादांवर निपटारा केला जाणार नाही तर देशांतर्गत खटले देखील सोडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी सरन्यायाधीश रमणा यांनी न्यायाधीश हिमा कोहली यांना लवाद केंद्रासंदर्भात योग्य खबरदारी घेण्याचे आणि गरजेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश रमणा यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचेही आभार मानले. या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आणि आवश्‍यक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. या लवाद केंद्रामुळे व्यावसायिक वाद मिळवण्यासाठी परदेशात दौरे करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT