Flight  Esakal
देश

Omicron : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत उड्डाणांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron Variant) संभव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights suspended till 31 Jan 2022 in india ) 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.

देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आढळून आल्यामुळे आणि भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर अनेक राजकारण्यांनी पंतप्रधान मोदींकडे धोकादायक असणाऱ्या देशांतून देशात येणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT