hyderabad bangalore prayagraj flights to start from pune 
देश

परदेशी वारी लांबणीवरच! 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

विनायक होगाडे

नवी दिल्ली : परदेशात जाऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न सध्यातरी अधुरंच राहणार आहे. कारण केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी 31 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation - DGCA) आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांवरील प्रतिबंध एका महिन्यासाठी वाढवले आहेत. मात्र, काही मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे 23 मार्च 2020 रोजी भारतात शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्दबातल ठरवण्यात आली होती.

DGCA ने आपल्या आदेशात म्हटलंय की, 31 जुलै, 2021 च्या 23:59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध कायम राहतील. गेल्या वर्षी 23 मार्च रोजी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू करण्यात आलेले निर्बंध आजही कायम आहेत. मात्र, प्रवाशांच्या अखंड वाहतुकीसाठी अनेक देशांशी द्विपक्षीय हवाई बबल करारानुसार भारताने विविध आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालविली आहेत. भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, केनिया, भूटान आणि फ्रान्स सहित 27 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. दोन देशांच्या दरम्यान एअर बबल पॅक्ट अंतर्गत त्यांच्या विमान कंपन्या त्यांच्या प्रदेशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT