nirmala sitaraman sakal media
देश

गुंतवणुकदारांना व उद्योजकांना भारतात सुवर्णसंधी - निर्मला सीतारामन

कृष्ण जोशी

न्यूयॉर्क : भारतात स्पष्ट विचारसरणीचे आणि वचनबद्ध नेतृत्व असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जागतिक पुरवठासाखळीतील फेरबदलानंतर (international market changes) देशात सर्वच उद्योजकांना (all traders) आणि गुंतवणुकदारांना (investors) भरपूर संधी उपलब्ध झाल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉशिंग्टन येथील बैठकीनंतर न्यूयॉर्क येथे त्यांनी हे वक्तव्य केले. जागतिक पातळीवरील उद्योजक व गुंतवणुकदारांच्या गोलमेज परिषदेत त्या बोलत होत्या. फिक्की तसेच न्यूयॉर्कमधील यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतातील स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत असून ते भांडवली बाजारातूनही पैसा उभा करीत आहेत. त्याचवेळी भारताने कोरोनाच्या प्रतिकूल काळातही डिजिटल व्यवस्थेचा पुरेपूर फायदा उठवला असेही त्यांनी दाखवून दिले.

मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष अजय बंगा तसेच सीईओ मायकेल मिबॅच, फेडेक्स चे अध्यक्ष राज्य सुब्रमणियम, सिटीग्रूपचे सीईओ जेन फ्रेजर व आयबीएम चे अध्यक्ष अरविंद कृष्णा, प्रुडेन्शिअल फायनान्शिअल चे स्कॉट स्लेस्टर, आदींची त्यांनी भेट घेतली. भारतातील सुधारणांचे पर्व योग्य मार्गावर असून विकासासाठी मोठ्या संधी आहेत, असे या भेटीनंतर बंगा यांनी सांगितले. भारतात उत्पादनाशी निगडित असलेल्या प्रोत्साहन योजना स्वागतार्ह असून त्यामुळे देशात कामगारकेंद्री उद्योग उभे राहू शकतील, असेही ते म्हणाले.

भारतात एखाददुसरीच सुधारणा होत नसून सुधारणांची मालिकाच सुरु आहे व त्याचमुळे भारताला योग्य दिशा सापडते आहे. जागतिक पुरवठा साखळीत सहभागी होण्याची भारताला मोठी संधी असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारतातील या बदलांबाबत आपण आशावादी आहोत, असेही बंगा यांनी सांगितले. बंगा यांचा आशावाद योग्य असून सीतारामन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपला विश्वास अजून वाढला आहे. मास्टरकार्डतर्फे भारतात यापुढेही गुंतवणुक केली जाईल, असे मिबॅच म्हणाले. फेडेक्स चा भारतातील व्यवसायही वाढत असल्याचे, भारताच्या विकासाबाबत आम्ही आशावादी आहोत, असे सुब्रमणियम यांनी सांगितले.

भारतातील संधींबाबत आम्ही सकारात्मक आहोत, परदेश व्यापारातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याचा फायदा भारताला होईलच, पण जगात आपला व्याप वाढवू इच्छिणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीही भारत हे योग्य स्थान असेल. डिजिटल व्यवहारांमध्येही देशाने मोठीच आघाडी घेतली असून डिजिटल सेवा आणि डिजिटल व्यापाराचे भारत हे लौकरच मोठे केंद्र होईल, असा विश्वासही सीतारामन यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT