International Monetary Fund esakal
देश

International Monetary Fund: जागतिक वाढीत चीन-भारताचे निम्मे योगदान

आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर ४.६ टक्के होण्याची अपेक्षा

रुपेश नामदास

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर २०२२ मधील ३.८ टक्क्यांवरून ४.६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, या क्षेत्राचा जागतिक विकासात सुमारे ७० टक्के वाटा असेल, असे या अहवालात म्हटले आहे.

आशिया प्रशांत क्षेत्राचा जगातील सर्वांत गतिशील प्रमुख क्षेत्रांमध्ये समावेश असेल आणि या क्षेत्राच्या या दोन सर्वांत मोठ्या आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था जागतिक वाढीमध्ये जवळपास निम्मे योगदान देतील. उर्वरित आशिया आणि प्रशांत क्षेत्राचा हिस्सा उर्वरित अर्ध्या भागाचा पाचवा भाग असेल, असे ‘आयएमएफ’ने नमूद केले आहे.

चीनमधील अर्थव्यवस्था रुळावर आल्याने आणि भारतातील लवचिक वाढीमुळे आशियातील आर्थिक प्रगतीला चालना मिळत असली, तरी उर्वरित आशियातील वाढ इतर क्षेत्रांच्या अनुषंगाने मंदावण्याची अपेक्षा आहे. जागतिक वाढ मंदावत असल्याने २०२३ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असल्याचे दिसते.

कारण मध्ये महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरांमध्ये वारंवार वाढ करण्याच्या धोरणामुळे आणि युक्रेन-रशियातील युद्धामुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम होत आहे, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.

याव्यतिरिक्त, महागाईचा दबाव आणि अमेरिका व युरोपमधील अलीकडील आर्थिक समस्या आधीच गुंतागुंतीची आर्थिक स्थिती आणखी बिकट करत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, स्टार्टअपची जगातील सर्वांत मोठी कर्ज पुरवठादार असलेली सिलिकॉन व्हॅली बँक दहा मार्च रोजी कोसळली, तर गेल्या सोमवारी फर्स्ट रिपब्लिक बँकही नियामकांनी जप्त केली. या अलीकडच्या घडामोडी जागतिक अर्थव्यवस्थेच्या आसपासच्या अनिश्चिततेत भर घालत आहेत.

अमेरिकेतील अनेक बँका बुडाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेसह अमेरिकेतील काही बँकांच्या पतनाने जागतिक बँकिंग उद्योगात खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, चीनने आपली अर्थव्यवस्था पुन्हा खुली केल्याने आशिया प्रशांत क्षेत्रातील वाढीलाही नवी चालना मिळाली आहे. तथापि, यावर समाधान मानावे अशी स्थिती नाही. महागाई लक्ष्याच्या मर्यादेत येईपर्यंत महागाईविषयक धोरण कठोर असले पाहिजे, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. चीन आणि जपानमध्ये उत्पादन क्षमतेपेक्षा कमी असून, महागाई कमी होत आहे, असाही सावधगिरीचा इशारा ‘आयएमएफ’ने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT