captain amrinder singh sakal
देश

"अमरिंदर सिंग आणि पाकिस्तानच्या संबंधांची चौकशी करा"

स्वतःचा पक्ष स्थापन्यावरुन काँग्रेसचं टीकास्त्र

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन्याची घोषणा केल्यानंतर तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा मानस बोलून दाखवणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. कॅप्टन यांनी स्वतःलाच उद्ध्वस्त करुन घेतलंय असं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच अमरिंदर सिंग आणि पाकिस्तानच्या संबंधांची चौकशी करा, अशी मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांनी केंद्रातील भाजप सरकारकडे केली आहे.

माध्यमांशी बोलताना रंधवा म्हणाले, "कॅप्टन यांनी कायमच भाजपला शिव्या घातल्या आहेत. सन १९८४ मध्ये त्यांनी लष्करातून राजीनामा दिला होता. यावेळी त्यांचे पाकिस्तानशी काय संबंध होते आणि त्यांनी राजीनामा का दिला? याची चौकशी भाजपनं सुरु करावी. कॅप्टन हे नक्कीच कोणत्यातरी दबावाखाली असतील कारण त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या मुलांविरोधात अनेक केसेस दाखल झाल्या आहेत." आम्हाला अमरिंदर यांच्या निर्णयाची भीती वाटत नाही, असंही रंधवा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरिश रावत यांनी देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्ष स्थापण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला अर्थात काँग्रेसला काहीही फरक पडत नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळं आमच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही, उलट ते आमच्या विरोधकांची मतं खातील. अमरिंदर यांचा निर्णय धक्कादायक असल्याचं सांगताना त्यांनी स्वतः मधील धर्मनिरपेक्ष अमरिंदर मारुन टाकला आहे, अशी कडवी टिपण्णीही रावत यांनी केली.

दरम्यान, शेतकरी कायद्यांवरुन रावत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. म्हणाले, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर गेल्या दहा महिन्यांपासून रखडवणाऱ्या भाजपला कोणीही विसरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT