RAW 
देश

RAW च्या प्रमुखपदी या IPS ऑफिसरची निवड, कोण आहेत रवी सिन्हा ?

देशाची गुप्तचर संस्था रॉ प्रमुख पदासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

धनश्री ओतारी

देशाची गुप्तचर संस्था रॉ प्रमुख पदासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. आता देशाची गुप्तचर संस्था रॉ प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे, छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील.(Ravi Sinha, IPS (CG:88) to be the new Secretary, Research & Analysis Wing.)

मिळालेल्या माहितीनुसार, 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) छत्तीसगड कॅडरचे अधिकारी सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.

मंत्रिमंडळाने नियुक्तीला मान्यता दिली

मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सिन्हा यांनी सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली आहे. गोयल हे 30 जून 2023 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

कोण आहेत रवी सिन्हा ?

रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT