Iran reaches out to India as fears of a possible US military strike grow, signaling heightened diplomatic activity amid escalating Middle East tensions.

 

esakal

देश

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

Iran Contacts India Amid US Attack Concerns: भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे माहिती, जाणून घ्या काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Iran contacts India amid US attack fears : इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना फोन केला आणि इराणसह आसपासच्या भागातील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली आहे. विशेष म्हणजे  जयशंकर यांनी स्वतः ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

 इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला फोन केलेला आहे. विशेष म्हणजे एक दिवस आधीच अमेरिकेचे परराष्ट्र सचिवही एस जयशंकर यांच्याशी बोललेले आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या प्रमुख घडामोडींमध्ये इराणने भारताला केलेला फोन अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अरघची यांनी जयशंकर यांना या प्रदेशात निर्माण होत असलेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना केलेला फोन तेहरानकडून एक महत्त्वाचा संदेश म्हणून पाहिला जात आहे. भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी दीर्घ आणि मजबूत संबंध आहेत. त्यामुळे या संकटात इराणला भारताकडून मध्यस्थी किंवा राजनैतिक मदतीची अपेक्षा असल्याचे दिसत आहे.

एस जयशंकर यांनी काय सांगितले? -

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी फोन केला. आम्ही इराण आणि आसपासच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT