IRCTC News esakal
देश

IRCTC News : रेल्वे प्रवासातही आता पाळावे लागणार विमानाचे नियम; वाचा नेमके बदल

सामान्य नागरीकाला प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारं माध्यम असणाऱ्या रेल्वेच्या सफरीलाही आता विमानाचे नियम लागणार आहेत. जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Luggage Rules for Railway Passengers : सामान्य नागरीकाला प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारं माध्यम असणाऱ्या रेल्वेच्या सफरीलाही आता विमानाचे नियम लागणार आहेत. विमानाचा प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचे नियम माहित असतात आणि तसे ते पाळलेही जातात. पण आता तसे काही नियम तुम्हाला रेल्वेने प्रवास करतानाही पाळावे लागणार आहेत.

विमान प्रवासाला जाताना किती वजनाचे सामान न्यावे यावर निर्बंध आहे. पण रेल्वेने प्रवास करणारा सामान्य माणूस बऱ्याचदा आपलं बिऱ्हाडच जणू त्यातून वाहून नेत असतो. आता यावर निर्बंध येणार आहेत. रेल्वेने प्रवास करताना किती सामान न्यावं याचे नियम ठरवण्यात आले आहेत.

किती सामान नेता येणार?

रेल्वेने प्रवास करताना एक प्रवासी जास्तीत जास्त ५० किलो वजनाचं सामान सोबत घेऊन जाऊ शकतो. यापेक्षा जास्त सामान नेण्यासाठी भाडं मोजावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला वेळं तिकीटंही खरेदी करावं लागेल. शिवाय प्रत्येक कोचसाठी याची मर्यादा वेगवेगळी आहे.

  • AC कोच साठी जास्तीत जास्त मर्यादा ७० किलोची आहे.

  • स्लीपर कोचसाठी सर्वाधिक मर्यादा केवळ ४० किलोची आहे.

सामानाचा आकार

रेल्वे प्रवास करताना सामानाच्या आकारावर पण नियम आहेत. जर मोठ्या आकाराचं सामान नेणार असाल तर त्यावर कमीत कमी ३० रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. तर निर्धारीत मर्यादेपेक्षा मोठ्या आकाराचं सामान न्यायचं असेल तर दीड पट जास्त चार्ज लागणार आहे.

मेडिकल सामान नेण्यासाठी आहेत अटी

जर कोणासोबत रुग्ण प्रवास करणार असेल, तर त्यासोबत नेलं जाणारं औषधी सामान याविषयीदेखील नियम घालण्यात आले आहेत. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावर ऑक्सिजन सिलेंडर आणि स्टँड नेता येणार.

हे सामान नेता येणार नाही

ज्वलनशील, विस्फोटक सामान नेता येणार नाही. अतिरीक्त शुल्क भरूनही १०० किलोपेक्षा जास्त सामान नेता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT