IRCTC Railway Recruitment 2023 esakal
देश

IRCTC Railway Recruitment 2023 : रेल्वेत परिक्षेशिवाय २४०० पदांवर होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वेने बऱ्याच विभागांमध्ये अप्रेंटिस साठी २४२२ पदांवर भरती करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC Railway Recruitment 2023 : रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वेने बऱ्याच विभागांमध्ये अप्रेंटिस साठी २४२२ पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे.

अर्ज भरण्याची तारीख

यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया नुकतीच सुरू झालेली आहे. तर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे. या भरतीसाठी कोणतीही प्रवेश परिक्षा घेतली जाणार नाही.

काय आहे पात्रता

  • १० आणि आयटीआय कोर्समध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेद्वारांची निवड होणार आहे. याच मेरीटवर निवड करण्यात येईल.

  • यात उमेद्वार ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयो मर्यादा

  • उमेद्वार १५ डिसेंबर २०२२ पर्यंत १५ ते २४ वयोगटातील असावा.

  • या ओबीसी गटासाठी वयो मर्यादा १५ ते २७ असेल.

  • एससी, एसटी गटासाठी १५ ते २९ तर दिव्यांगांसाठी १५ ते ३४ वर्ष वयोगट मर्यादा आहे.

स्टायपेंड किती?

  • या पदासांठी स्टायपेंड ७००० रुपये असणार आहे.

  • अर्ज फी - १०० रुपये.

कसा करावा अर्ज

अर्ज ऑनलाईन करावा लागेल. www.rrccr.com या संकेतस्थळावरून अर्ज करावा.

आवश्यक बाब

ट्रेनिंगचा काळ एकावर्षाचा असेल. या नंतर कामावर ठेवलंच जाईल यासाठी नियुक्ती करणारा बांधील नसेल. तर नियुक्ती करणाऱ्याने सांगितलेल्या नोकरीवर रुजू होणं उमेदवारालाही बंधनकारक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT