modi shikh.jpg
modi shikh.jpg 
देश

Farmer Protest: मोदींनी शीख समुदायासाठी काय-काय केलं ? IRCTC ने 2 कोटी ई-मेल्स पाठवून दिली माहिती

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- आयआरसीटीसीने 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान सुमारे दोन कोटी ई-मेल पाठवून आपल्या ग्राहकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी घेतलेल्या 13 निर्णयाबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित तीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान हे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. आयआरसीटीसीने आपल्या ग्राहकांना 47 पानांची पुस्तिका 'प्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीखांसोबतचे विशेष संबंध' पाठवली आहे. सरकारच्या जनहित संपर्काअंतर्गत ही पुस्तिका पाठवण्यात आली आहे. विधेयकावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या शंका दूर करणे, हा यामागचा उद्देश आहे. 

हे पुस्तक हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-मेल आयआरसीटीसीच्या संपूर्ण डेटाबेसला पाठवण्यात आली आहे. प्रवासी आपले तिकीट बुक करताना आपली संपूर्ण माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर भरत असतो. 12 डिसेंबरला ई-मेल पाठवणे बंद करण्यात आले होते. हे ई-मेल फक्त शीख समुदायाला पाठवण्यात आल्याचे वृत्त आयआरसीटीसीने फेटाळले आहे. 

आयआरसीटीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, हे ई-मेल्स सर्व समाजाच्या ग्राहकांना  पाठवण्यात आले आहेत. असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जनहितार्थ सरकारी कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआरसीटीसीने असे केलेले आहे. रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की, आयआरसीटीसीने 12 डिसेंबरपर्यंत 1.9 कोटी ई-मेल्स पाठवले आहेत. जनहितासाठी हे ई-मेल्स केले होते. कॉर्पोरेट कंपन्या जे रोज करतात. त्याचपद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही चागंले काम करण्यास सरकारी संघटना सक्षम आहेत. 

या पुस्तकात 1984 मधील दंगल पीडितांना न्याय, श्री हरमंदर साहिब, जालियनवाला बाग स्मारकाला देण्यात आलेले एफसीआरए नोंदणीची परवानगी, करमुक्त लंगर, कर्तारपूर समवेत इतर बाबींबर प्रकाश टाकण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात शीख समुदायाचा मोठा सहभाग आहे. पंजाब, हरियाणामध्ये मोदी सरकारविरोधात रोष आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे ई-मेल्स पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. शीख समाजात प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT