cable bridge collapsed in the Machchhu river Morbi area Several people fear injured  
देश

Morbi Bridge Collapse: पूल दुर्घटनेला व्यवस्थापनातील लोक जबाबदार? पोलीस म्हणतात...

या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोरबी (गुजरात) : मोरबी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी स्थानिक पोलिसांनी या पूलाचं व्यवस्थापन बघणाऱ्या काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या पूलाची नुकतीच दुरुस्ती झाली होती, तरीही इतकी मोठी दुर्घटना कशी घडली असा सवाल आता विचारला जात आहे. यापार्श्वभूमीवर ही चौकशी होऊ शकते. (Is managment people responsible for Morbi Bridge Collapse incident what Police said)

मोरबीचे पोलीस अधीक्षक राहुल त्रिपाठी यांनी सांगितलं की, व्यवस्थापनातील काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे. तसेच पुलाची देखभाल करणाऱ्या एजन्सीविरोधात कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

रविवारी गुजरातच्या मोरबी इथं ही घटना घडली. यामध्ये आ शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखलत्तापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. काही दिवसांपूर्वीच या पूलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं पण त्याला अद्याप फिटनेस प्रमाणपत्र मिळालं नव्हतं तरी देखील हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणावर देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १ नोव्हेंबर रोजी मोरबीला भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT