maneka gandhi  sakal
देश

ISKCON : गोशाळेतील गोवंशाची ‘इस्कॉन’कडून विक्री; मेनका गांधींची टीका, संघटनेकडून खंडन

गोशाळेतील गायी कसायाला विकण्याचे काम करते

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांनी थेट आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघावर (इस्कॉन) कठोर शब्दांत टीका करताना या संघटनेवर फसवणुकीचा आरोप केला आहे. ही संघटना गोशाळेतील गायी कसायाला विकण्याचे काम करते, असे त्यांनी म्हटले आहे.

‘इस्कॉन’ने मात्र गांधी याचे हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्यांचे खंडन केले आहे. ‘आमची संघटना केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये बैल आणि गायींचे संरक्षण करण्याचे काम करते. हे प्राणी जिवंत असेपर्यंत आम्ही त्यांची सेवा करतो,’ असे या संघटनेकडून सांगण्यात आले.

मेनका गांधी या समाजमाध्यमांतून नेहमीच प्राणी हक्काचा मुद्दा आग्रहीपणे मांडत असतात, त्यांचा असाच एक टीका करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मेनका गांधी म्हणतात,‘‘ इस्कॉन ही या देशातील सर्वांत मोठी फसवणूक असून ही मंडळी गोशाळा उभारतात आणि सरकारी योजनांचे फायदेही लाटतात.

याच सवलतींच्या नावाखाली त्यांनी अनेक जमिनी देखील मिळविल्या आहेत.’’ आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ‘‘ त्या गोशाळेमध्ये मला एकही भाकड गाय दिसून आली नाही, अथवा एकही वासरू दिसले नाही.

याचाच दुसरा अर्थ त्या सगळ्यांची विक्री झाली होती. ‘इस्कॉन’कडून गायींची कसायाला विक्री होत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. ते ज्या पद्धतीने हे काम करतात तसे कुणीही करत नाही. एवढे करून ही मंडळी नंतर ‘हरे राम, हरे कृष्ण’ हे भजन गात रस्त्याने फिरत असतात. आमचे सगळे जीवनच दूधावर आधारित असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो.’’

आश्चर्याचा धक्का बसला

‘इस्कॉन’चे राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी याबाबत म्हटले आहे, ‘‘ आमची संघटना गोवंश संरक्षणामध्ये अग्रेसर असून केवळ देशातच नव्हे तर जगभरामध्ये आमचे काम सुरू आहे. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही गायींचे संरक्षण करतो. जगाच्या अनेक भागांमध्ये आम्ही गोवंश संरक्षणाबाबत जाणीवजागृती केली आहे. स्वतः गांधी या देखील ‘इस्कॉन’ला खूप मानतात पण त्यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात आल्याचे उघड झाल्याने आम्हाला धक्काच बसला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT