Israel PM Benjamin Netanyahu
Israel PM Benjamin Netanyahu File Photo
देश

जगातील पहिला कोविडमुक्त देश ठरल्याची इस्राईलची घोषणा!

Amit Ujagare (अमित उजागरे)

जेरुसलेम : जगातील पहिला कोविडमुक्त देश म्हणून इस्राईलने घोषणा केली असून हा जगातील पहिला मास्क विरहित देश होणार आहे. सध्या बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असून हा नियम देखील आता १५ जूनपासून मागे घातला जाणार असल्याची घोषणा इस्राईलचे आरोग्यमंत्री युली ॲडलस्टीन यांनी केली. या देशात आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. (Israel claims to be a worlds first covid-19 free country)

इस्राईलने हर्ड इम्युनिटी मिळवल्यानंतर देशातील बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे देशात मास्क घालण्याचे बंधन काढून घेण्यात आले. आरोग्य मंत्री ॲडलस्टीन यांनी म्हटले की, "देशात संसर्ग पसरला नाही तर निर्बंध संपूर्णपणे मागे घेतले जाईल. तत्पूर्वी गर्दीवर बंदी आणि सामाजिक अंतर राखण्याविषयीचे नियम एक जूनपासूनच मागे घेण्यात आले आहेत. अर्थात परदेश प्रवासासंदर्भात बंधने कायम ठेवली आहेत. सध्या नऊ देशाच्या प्रवासावरची बंदी आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइनचे नियम लागू असून कोरोना चाचणी देखील आवश्‍यक आहे."

दुसरीकडे इस्राईलमध्ये १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. इस्राईलमध्ये लसीकरण मोहीम २० डिसेंबर २०२० पासून सुरू झाली होती आणि ती वेगाने राबवली गेली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि ६५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर लसीकरणासाठी वयाचे बंधन कमी करण्यात आले.

या देशात मास्कची गरज नाही

  1. भूतान : भूतानमध्ये केवळ दोन आठवड्यातच ९० टक्क्यांहून अधिक वयस्कर लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर भूतानमध्ये संसर्गामुळे केवळ एकच व्यक्ती दगावला आहे. कोविडचे केंद्रबिंदू राहिलेले चीन आणि दुसऱ्या लाटेचा सामना केलेल्या भारताच्या सीमा भुतान लगत असल्या तरी या देशात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही.

  2. न्यूझीलंड : कोविड संसर्गाची लाट चांगल्या रितीने हाताळणाऱ्या न्यूझीलंडचे जगभरात कौतुक होत आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या प्रयत्नामुळे देशभरात केवळ २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या गतिशील कारभारामुळे न्यूझीलंड मास्क फ्री देश बनला आहे. काही दिवसांपूर्वीच ऑकलंडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता आणि मास्क न घालता सुमारे ५० हजार नागरिक जमले होते.

  3. चीन : कोविडचा केंद्रबिंदू असलेल्या चीनने कमी कालावधीच लसीकरणाची मोहीम राबवत मास्क घालण्याच्या नियमावर मात केली आहे. जगातील सर्वाधिक बाधित देशांत चीनचा समावेश होता. परंतु आता पर्यटन क्षेत्रही सुरू केले आहे. आता चीनमध्ये बहुतांश थीम पार्क आणि हॉटेल सुरू झाले आहेत.

  4. अमेरिका : शंभर टक्के लसीकरण झालेल्या भागात मास्क फ्री राहण्याचे सांगितले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲड प्रिव्हेशनने म्हटले की, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीने मास्क घालण्याची गरज नाही. पायी चालताना, धावताना, फिरायला जाताना मास्क घालण्याची आवश्‍यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT