Israel Embassy 
देश

Israel Embassy Incident : दिल्लीतील इस्त्रायली दुतवासाबाहेरील स्फोट प्रकरणात मोठी अपडेट! CCTVमध्ये आढळले 2 संशयित

नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ मंगळवारी स्फोट झाल्याची बातमी समोर आली. दूतावासाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या भूखंडात हा स्फोट झाला...

रोहित कणसे

नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ मंगळवारी स्फोट झाल्याची बातमी समोर आली. दूतावासाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या भूखंडात हा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा झाली नसली तरी पोलिसांना या स्फोटाच्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यासोबत एक झेंडाही जप्त करण्यात आला होता. एका पानाच्या या पत्रात इस्रायलबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात दोन संशयित आढळून आल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांची माहिती शोधली जात आहे. लवकरच याचा शोध घेतला जाईल. दोन्ही संशयित घटनास्थळी कसे आणि कोणत्या मार्गाने आले याचा शोध घेण्यासाठी पोलिस आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत आहेत.

या घटनास्थळी धमकीचे पत्रही मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे पत्र इस्रायली दूतावासाला लिहिले आहे, त्यात धमकीचे शब्द वापरण्यात आले आहेत. हे पत्र इंग्रजीत लिहिले आहे. पत्रावर Sir Allah resistence असे लिहिले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नेमकं झालं काय?

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चाणक्यपुरी येथील इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दूतावासामागील रिकाम्या प्लॉटवर हा स्फोट झाल्याचे अज्ञात फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे विशेष पथक पाठवून शोध घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाजवळ इस्रायली दूतावासाच्या राजदूतांना उद्देशून टाइप केलेले पत्र सापडले आहे. या पत्रात झेंडा गुंडाळण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रात गाझामधील इस्रायलच्या कारवाईचा उल्लेख करण्यात आला असून सूड घेण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT