देश

Israel-Hamas Crisis: इस्राईलकडून गाझाच्या रुग्णालयांना केलं जातय लक्ष्य ! अल-शिफानंतर आणखी एका हॉस्पिटलवर हल्ला

गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयानंतर इस्राईलने उत्तर गाझामधील आणखी एका रुग्णालयाला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Israel attacked on Hamas: गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयानंतर इस्राईलने उत्तर गाझामधील आणखी एका रुग्णालयाला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य केले आहे. ‘इंडोनेशियन’ या नावाच्या या रुग्णालयात हजारो रुग्ण आणि विस्थापित अनेक आठवड्यांपासून आश्रयाला असून त्यांचा जीव या हल्ल्यांमुळे धोक्यात आला आहे. गाझामधील रुग्णालयांमध्ये हमासचे दहशतवादी लपून बसले असल्याचा इस्राईलच्या लष्कराचा दावा आहे. या संघर्षात गाझामधील आरोग्यसेवा मात्र पूर्णपणे कोलमडली आहे.

अल शिफा रुग्णालयाच्या परिसरात अनेक दिवस संघर्ष झाल्यानंतर या रुग्णालयातून बहुतेक सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. यानंतर आज उत्तर गाझामधील इंडोनेशियन रुग्णालयाच्या परिसरात जोरदार हल्ले झाले. अल शिफावर हल्ले होत असल्याने तेथील आणि इतर भागांतील अनेक जखमी रुग्ण आणि सामान्य नागरिकही या रुग्णालयात आश्रयाला आले आहेत.

रुग्णालयाच्या परिसरात इस्राईलचे रणगाडे दिसत असून मोठ्या प्रमाणावर गोळीबारही सुरु असल्याचे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हमासला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचा आणि त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयांचा बळी जात असल्याची टीका जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.(Latest Marathi News)

जेरुसलेम : हमास आणि इस्राईल यांच्यातील संघर्षाची व्याप्ती वाढली असून लाल समुद्रातून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहतूक करणाऱ्या जहाजावर येमेनमधील हौथी बंडखोरांनी सोमवारी हल्ला करत ते ताब्यात घेतले. हे जहाज इस्राईलमधील एका कंपनीच्या मालकीचे आहे. या जहाजावरील २५ कर्मचाऱ्यांनाही बंडखोरांनी ओलिस ठेवले आहे. इस्राईलशी संबंध असल्यानेच जहाजावर हल्ला केल्याचे आणि यापुढेही असे हल्ले करणार असल्याचे हौथी बंडखोरांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT