फाइल फोटो 
देश

Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊ दुसरं विमान दिल्लीत दाखल! दोन लहान मुलांसह 235 जणांचा समावेश

इस्राइल आणि हमास यांच्यात गेले आठवड्यापासून जोरदार युद्ध सुरू आहे.

रोहित कणसे

इस्राइल आणि हमास यांच्यात गेले आठवड्यापासून जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे 3,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्राइलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. याअंतर्गत इस्राइलमधून भारतीयांची दुसरी खेप शनिवारी सकाळी दिल्लीत पोहोचली. यामध्ये दोन अर्भकांसह 235 लोकांचा समावेश आहे. 212 भारतीयांचा पहिला गट शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचली होती.

भारतीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी इस्त्राइलमधून भारताकडे निघालेल्या नागरिकांमध्ये 235 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विमानाने तेल अवीव येथून रात्री 11.02 वाजता उड्डाण केले. भारतीय दूतावासाने सांगितले की, दूतावासाने तिसर्‍या बॅचमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना ईमेलद्वारे कळवले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी लोकांना पुन्हा मेसेज केला जाईल.

इस्त्राइलमध्ये काय सुरू आहे?

इस्राइलमध्ये जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या मुद्द्यावर हे वातावरण पेटलं आहे. इस्त्राइलवर करण्यात आलेल्या हल्ला हा मशिदीला अपवित्र केल्याचा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने की इस्राइली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकल्याचे म्हटले आहे. इस्राइलचे सैन्य हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्राइली सैन्य महिला आणि मुलांवर हल्ले करत असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्या हमासचे प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT