GSLV-F10/EOS-03 mission  ISRO
देश

'आकाशातील नेत्र', GISAT-1 चं उद्या लाँचिंग, इस्रोने सुरु केलं काऊंटडाऊन

GSLV-F10 EOS-03 मिशनमुळे भारताची शक्ती कशी वाढणार? काय आहेत फायदे? समजून घ्या....

दीनानाथ परब

नवी दिल्ली: GSLV-F10 EOS-03 मिशनसाठी काऊंटडाऊन सुरु झालं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने बुधवारी सकाळी ही माहिती दिली. जीएसएलव्ही रॉकेटमधून (EOS) - GISAT-1 उपग्रहाचे उद्या पहाटे ५.४३ च्या सुमारास प्रक्षेपण करण्यात येईल. EOS-03 GISAT-1 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. आंध्र प्रदेश श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण होईल. स्वातंत्र्यदिनापूर्वी होणाऱ्या या उपग्रह प्रक्षेपणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रक्षेपणाची वेळ नियोजित असली, तरी वातावरणावरही बरचं काही अवलंबून असेल, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.

GSLV-F10/EOS-03 मिशनसाठी काऊंटडाऊन सुरु झाल्याची माहिती इस्रोने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन दिली. या टि्वटमध्ये अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेल्या GSLV-F10 मोहिमेचा फोटोही पोस्ट केला आहे. GISAT-1 आकाशातील भारताचे नेत्र असणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती मिळेल. त्यादृष्टीने झटपट पावलं उचलता येतील, असं इस्रोमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

शेती, जंगल, खनिजशास्त्र, बर्फ, ग्लेशिअर आणि महासागरविज्ञान यामध्येही यामध्येही GISAT-1 ची मदत होणार आहे. GISAT-1 EOS-03 हा २,२६८ किलो वजनी उपग्रह आहे. जीएसएलव्ही रॉकेमधून हा उपग्रह जीटीओ कक्षेत स्थापित करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT