Chandrayaan-3 Launch Time eSakal
देश

Chandrayaan 3 Mission: भारताची गरुडझेप! चांद्रयान ३ मोहीम यशस्वीरित्या लॉन्च

Chandrayaan 3 Mission launch: भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chandrayaan 3 Mission: भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं. एलएमव्ही-३ या रॉकेटचा वापर करुन हे यान लाँच करण्यात आलं. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर लँड होईल.

एएनआयच्या माहितीनुसार, चांद्रयान ३ विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. या यानाचं वजन ३,९०० किलो इतकं आहे. यातील मॉड्यूलचं वजन २,१४५.०५ किलो आहे. तर १,६९६.३९ किलो केवळ इंधन असणार आहे.

या यानानं अवकाशात झेप घेतल्यानंतर त्याचे काही भाग वेगळे झाले आणि मुख्य भागानं चंद्राकडं आगेकूच केली. यावेळी सतीश धवन केंद्रात केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला. (Latest Marathi News)

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम

या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा जगातील पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळणार आहे. (Marathi Tajya Batmya)

चंद्रावर कधी पोहोचणार?

आज लाँच झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-३ ला सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ किंवा २४ ऑगस्ट या दिवशी चांद्रयान चंद्रावर उतरेल. काही अडचणी आल्यास, या तारखा बदलूही शकतात असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

सॉफ्ट लँडिंगचं लक्ष्य

चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान विक्रम लँडर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाच क्रॅश झालं होतं. त्यामुळं, आता चांद्रयान ३ मोहिमेत हे लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हे सर्वात मुख्य लक्ष्य असणार आहे. चांद्रयान-३ मधील लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे.

PM मोदींच्या ट्विटद्वारे शुभेच्छा

चंद्रावर जाण्यासाठी सज्ज असलेला भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान ३ प्रक्षेपणासाठी सज्ज असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पण काही तासांपूर्वी त्यांनी या मोहिमेला ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच 14 जुलै २०२३ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या यापूर्वी झालेल्या दोन चांद्रमोहिमांनी काय साध्य केलं हे देखील त्यांनी सविस्तरपणे मांडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT