ISRO Chief Dr S Somanath diagnosed with cancer 
देश

ISRO Chief S Somanath : आदित्य-L1च्या लाँचिंगच्या दिवशीच झालं कँसरचं निदान, तरीही...; इस्रो प्रमुखांचा मोठा खुलासा

ISRO Chief Dr S Somanath diagnosed with cancer : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झालं होतं अशी माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

ISRO Chief Dr S Somanath diagnosed with cancer : भारताच्या सूर्य मिशन आदित्य-एल १ (Aditya-L) च्या प्रक्षेपणाच्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झालं होतं अशी माहिती समोर आली आहे.

सोमनाथ यांनी एका मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा देत स्कॅनिंगमध्ये कॅन्सर आढळून आल्याचे सांगितले. चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणादरम्यानही आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्या होत्या. मात्र, त्यावेळी काहीही स्पष्ट झाले नव्हते. आदित्य मिशनच्या दिवशी आपल्याला या आजाराचे निदान झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय देखील अस्वस्थ झाल्याचे सोमनाथ यांनी सांगितले.

इतकेच नाही तर त्यांचे सहकारी वैज्ञानिकांना देखील या बातमीने धक्का बसला. मात्र या आव्हानात्मक परिस्थितीत देखील त्यांनी स्वतःला सांभाळत काम सुरू ठेवलं. कुटुंबीय आणि वैज्ञानिकांना सांभाळलं. लाँचिंगनंतर त्यांच्या पोटाचे स्कॅनिंग करण्यात आले तेव्हा याबद्दल माहिती मिळाली होती. मात्र अधिक तपासण्या आणि उपचारासाठी ते चेन्नई येथे गेले. तेव्हा हा आजार अनुवांशिकरित्या मिळाल्याचे लक्षात आले. त्यांना पोटाच्या कँसरची लागण झाली होती.

कँसरचे निदान झाल्यानंतर सोमनाथ यांचं ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर केमोथेरपी सुरू करण्यात आली. सोमनाथ यांनी सांगितलं की यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. मात्र आता सर्वकाही ठिक आहे. उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले असून औषधं अद्यापही सुरू आहेत. मात्र यादरम्यान त्यांना कुटुंब आणि सहकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला असंही सोमनाथ यांनी सांगितलं.

इस्रोचे प्रमुख सोमनाथ पुढे बोलताना म्हणाले की, याच्या उपचारासाठी बराच काळ लागेल हे मला माहिती आहे. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. पण मी ही लढाई लढेल. बहुतांश रिकव्हरी पूर्ण झाली आहे. मी फक्त चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर माझं काम पूर्ण केलं. कुठल्याही वेदनेशिवाय पाचव्या दिवशी मी इस्रोमध्ये काम करू लागलो होतो.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, मी सातत्याने मेडिकल चेकअप्स आणि स्कॅन करून घेत आहे. मात्र आता पूर्णपणे बरा झालो आहे. आपलं काम आणि इस्रोचे मिशन्स आणि लाँच वर पूर्णपणे लक्ष केंद्रीत आहे. इस्रोचे पुढील सर्व मिशन्स पूर्ण करूनच मी थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Angarki Sankashti 2026 : गणपतीपुळेत लोटला भाविकांचा महासागर! अंगारकीला 70 हजार भक्तांनी घेतले दर्शन; 80 लाखांची उलाढाल

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : रायगडात पाणीटंचाईचा धोका वाढला; २८ धरणांत केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT