isro chief s somnath stopped the publication of his autobiography after Controversy marathi news  
देश

ISRO Chief : इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी थांबवलं वादग्रस्त आत्मचरित्राचं प्रकाशन, जाणून घ्या काय होता वाद?

इस्त्रोचे सध्याचे चीफ एस सोमनाथ यांनी आपल्या आत्मतरित्राचं प्रकाशन थांबवलं आहे

रोहित कणसे

इस्त्रोचे माजी प्रमुख सिवन यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर वाद सुरू झाल्यानंतर इस्त्रोचे सध्याचे चीफ एस सोमनाथ यांनी आपल्या आत्मतरित्राचं प्रकाशन थांबवलं आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात दावा केला होता की, सिवन यांनी त्यांना इस्त्रो चीफ बनण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपली आत्मकथा निलावु कुदिचा सिम्हांगल मध्ये अनेक आरोप केले होते.

आवश्यक टेस्ट न करताच चांद्रयान २ लाँच केलं गेल होतं आणि त्यामुळेच मिशन अयशस्वी झालं होतं असा दावाही त्यांनी केला होता.

एस सोमनाथ म्हणाले की, कुठल्याही संघटनेत स्वतःचं स्थान निर्माण करणे आणि त्यामध्ये वरीष्ठ पदांवर झेप घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे अडथळे सर्वांच्या आयुष्यात येतात. सोमनाथ म्हणाले की, माझा उद्देश कोणत्याही व्यक्तीवर अरोप करणे हा नव्हता तर अशा प्रकारच्या घटना घडतात हे सांगण्याचा होता. ते असेही म्हणाले की, या पुस्तकाचा मुख्य उद्देश जीवनाची कथा सांगणे हा नसून लोकांना समस्यांचा सामना करणे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याकरिता प्रेरणा देणे हा आहे.

२०१८ मध्ये ए एस किरण कुमार रिटायर झाल्यानंतर इस्त्रो चीफ बनण्यासाठी सिवन आणि एस सोमनाथ यांचे नाव पुढे आले होते. त्यावेळी सिवन रिटायर होणार होते मात्र त्यांची सेवा वाढवून त्यांना इस्त्रो चीफ बनवण्यात आले. चांद्रयान-२ च्या लाँचिक त्यांच्याच नेतृत्वात झाली होती, जी फेल झाली.

यासोबतच एस सोमनाथ यांनी आपल्या पुस्ताकात लिहीलं आहे की, सिवन यांनी इस्त्रो चीफ बनल्यानंतरही विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे निदेशक म्हणून आपले पद सोडले नव्हते. सोमनाथ यांना विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे निदेशक पद मिळवायचे होते पण सिवन यांनी पद सोडण्यास नकार दिला. मात्र माजी निदेशक डॉ. बी एन सुरेश यांनी याची दखल घेतली तेव्हा सहा महिन्यानंतर सोमनाथ यांना डायरेक्टर बनवण्यात आले. त्यांनी सांगितलं की अध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.

सोमनाथ यांनी दावा केला आहे की, चांद्रयान-२ च्या प्रचारामुळे देखील त्यावर वाईट प्रभाव पडला. यासोबतच सॉफ्टवेइर मध्ये बिघाड असल्याने ते चंद्रावर लँड होऊ शकलं नव्हतं. त्यांनी असाही दावा केला की चांद्रयान २ च्या लँडिगवेळी जेव्हा पंतप्रधान मोदी पोहचले होते तेव्हा त्यांना भेटू धिलं नव्हतं. या सर्व दाव्यांनंतर इस्त्रो चीफ म्हणाले की त्यांनी फक्त आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल लिहीलं आहे. ज्यापासून बाकीचे लोके प्रेरणा घेऊ शकतील. ही सर्वांसाठी साधारण बाब आहे की उंचीवर पोहचण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि विरोधाचा सामना देखील करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT