ISRO Satellite Launched Sakal
देश

ISRO Satellite Launched: इस्त्रोच्या 'बाहुबली LVM3'चे व्यवसायिक प्रक्षेपण यशस्वी

सकाळ डिजिटल टीम

श्रीहरीकोटा : इस्त्रोने आज मध्यरात्री पहिल्या व्यवसायिक रॉकेटचे प्रक्षेपण केले. इस्त्रोचे रॉकेट बाहुबली LVM3 हे जवळपास ३६ व्यवसायिक रॉकेटसह आकाशात झेपावले आहे. तर हे आत्तापर्यंतचे सर्वांत वजनदार रॉकेट असून भारताने व्यवसायिक रॉकेट लाँच करण्याच्या स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री १२ वाजून ७ मिनीटांनी हे रॉकेट प्रक्षेपित केले गेले.

(ISRO Successfully Launched Bahubali LVM-3 Rocket)

दरम्यान, भारताकडून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या रॉकेटमधील सर्वांत वजनदार रॉकेट मध्यरात्री प्रक्षेपित करण्यात आले असून याद्वारे एका खासगी उपग्रह कंपनी असलेल्या One Webच्या ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यानंतर इस्त्रोचे One Web India-1 हे मिशन पूर्ण झाले असून भारतीयांसाठी ही मोठी दिवाळी भेट आहे.

इस्त्रोने लाँच केलेल्या या रॉकेटची लांबी ४३.५ मीटर लांब असून यामध्ये जवळपास ८ हजार किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. या प्रक्षेपणासाठी २४ तासांचा काऊंटडाऊन ठेवण्यात आला होता. तर पुढील काही दिवसांत उपग्रहांचा आणखी एक सेट प्रक्षेपित केला जाणार असल्याचं इस्त्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast : दिल्लीतील न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; लाल किल्ला स्फोटानंतर राजधानीत पुन्हा खळबळ

Mumbai News: धक्कादायक! मुंबईत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर शिव्या अन् आक्षेपार्ह भाषा, चाललंय काय?

Viral Video Omkar Elephant : कांताराचं रुप असलेला ओंकार हत्ती वनतारात जाणार, 'या' निर्णयाने कोकणी रानमाणूस चिडून म्हणाला...

Latest Marathi Breaking News : छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, ६ नक्षलवादी ठार

मुश्रीफ-घाटगेंची युती अनपेक्षित नाही, दोघांनी लोकसभेला मला फसवलंय; संजय मंडलिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT