ISRO RH 200 sounding rocket test Successful 
देश

ISRO : साउंडिंग रॉकेटची झेप

माजी राष्ट्रपती ठरले चाचणीचे साक्षीदार

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने नवा इतिहास रचतानाच ‘आरएच-२००’ या साउंडिंग रॉकेटची आज यशस्वी चाचणी घेतली.

तिरूअनंतपुरम येथील थुंबा किनाऱ्यावरून ते प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधनातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचा दावा ‘इस्रो’कडून करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह अनेक मान्यवर या प्रक्षेपणाचे साक्षीदार ठरले. थुंबा इक्वॅटोरियल रॉकेट लॉचिंग स्टेशनवरून (टीईआरएलएस) हे प्रक्षेपण करण्यात आले. हवामानशास्त्र, खगोलशास्त्र आणि अंतराळ भौतिकीमधील महत्त्वाच्या प्रयोगांसाठी या रॉकेटचा वापर करण्यात येतो.

इस्रोचा हुकमी एक्का

‘रोहिणी’ मालिकेतील साउंडिंग रॉकेट (आरएसआर) ‘इस्रो’साठी हुकमी एक्का मानली जातात. ही सर्वांत वजनदार आणि अधिक जटिल अशी प्रक्षेपक वाहक आहेत. वातावरणीय आणि हवामानाचा अभ्यासासाठीच्या मोहिमांमध्ये त्यांचा वापर करण्यात येतो.

संशोधनासाठीचा अग्निबाण

संशोधनासाठीचा अग्निबाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्षेपकात एक किंवा दोन चरणांची स्थायू इंधन प्रणाली असते. वातावरणाच्या सर्वात वरच्यास्तराचा किंवा नजीकच्या अवकाशीय संशोधनासाठी याचा उपयोग होते. नवीन प्रक्षेपक किंवा उपग्रह प्रणालीच्या ‘प्रोटोटाईप’च्या परीक्षणासाठी याचा वापर केला जातो. भारतात २१ नोव्हेंबर १९६३ मध्ये थुंबा ‘इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन’ची स्थापना करण्यात आली होती.

मोहिमांसाठी लाभ

  • इक्वॅटोरियल इलेक्ट्रो जेट (ईईजे)

  • लिओनीड मेटॉर शॉवर (एलएमएस)

  • इंडियन मिडल अॅटमॉस्फेअर प्रोग्रॅम (आयएमएपी)

  • मॉन्सून एक्सपीरिमेंट (मोनेक्स)

  • मिडल अॅटमॉस्फेअर डायनॅमिक्स (एमआयडीएस)

  • सूर्यग्रहण-२०१०

भारतासाठी हे निश्चितपणे मोठे यश आहे, अवकाश सामर्थ्याबाबत आपण आता जगाच्या बरोबरीने आलो आहोत. एक काळ असा होता की आपल्याला प्रक्षेपणासाठीची साधनसामुग्री सायकलवरून न्यावी लागत होती. वैज्ञानिक संशोधनासाठी पुरेसे स्रोत देखील उपलब्ध नव्हते. आज मात्र परिस्थिती बदलली आहे.

- काशिनाथ देवधर, माजी समूह संचालक, ‘डीआरडीओ’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT