ISRO’s Astrosat Detects Unusual Changes in Black Hole Radiation sakal
देश

ISRO's Black Hole Discovery: 'इस्रो'च्या संशोधकांचे नवे निरीक्षण; ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ने टिपला कृष्णविवरातील अनोखा बदल!

ISRO’s Astrosat Detects Unusual Changes in Black Hole Radiation: ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’च्या मदतीने इस्रोच्या संशोधकांनी कृष्णविवरातील क्ष-किरण तेजस्वितेमध्ये झालेला अनोखा बदल टिपला आहे.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. इस्रोच्या संशोधकांनी कृष्णविवर ‘जीआरएस १९१५+१०५’च्या क्ष-किरण तेजस्वितेमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे निरीक्षण केले.

  2. प्रकाशाची तीव्रता काही सेकंदांसाठी कमी होते आणि नंतर ती पुन्हा वाढते, असे नमूद करण्यात आले.

  3. हे निरीक्षण कृष्णविवराविषयीच्या गूढ गोष्टी उलगडण्यास उपयुक्त ठरेल, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

ISRO Black Hole Study: भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या संशोधकांना कृष्णविवराचा अभ्यास करताना काही नवीन गोष्टी उलगडल्या आहेत.

‘जीआरएस १९१५+१०५’ नावाच्या एका कृष्णविवराच्या क्ष-किरणांच्या तेजस्वितेमध्ये बदल दिसला. हा प्रकाश कधी कमी होतो, तर कधी जास्त, असे आढळले. तीव्रता कमी झालेली स्थिती काही सेकंद टिकते आणि त्यानंतर तीव्रता वाढते, असे निरीक्षणांमधून दिसून आले आहे. कृष्णविवरांविषयी अनेक गूढ असून, ते उलगडण्यासाठी या निरीक्षणांची मदत होईल, असे मानले जाते.

भारताची ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ ही वेधशाळा २०१५पासून या कृष्णविवरावर नजर ठेवून आहे. ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’च्या मदतीने भारतीय शास्त्रज्ञ या कृष्णविवरामधील प्रत्येक छोटी-मोठी हालचाल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या निरीक्षणांमुळे कृष्णविवराच्या आजूबाजूच्या परिस्थिती समजून घेण्यासाठी मदत होईल, असे म्हटले जाते. ‘इस्रो’च्या संशोधक अंजू नंदी, आयआयटी गुवाहाटीचे सांताब्रत दास, हाफिजा विद्यापीठाचे श्रीहरि एच आणि आयआयटी गुवाहाटीचे शेषाद्री मजुमदार यांनी ही माहिती दिली.

कृष्णविवराच्या भोवती प्लाझ्माचे ढग असतात, त्यांना कोरोना म्हणतात. कृष्णविवराच्या कडांतून येणाऱ्या प्रकाशाची तेजस्विता जास्त असते, त्यावेळी कोरोना छोटा व गरम असतो. त्यामुळेच तेजस्विता वाढत असते. कोरोना मोठा व थंड झाल्यामुळे ही तेजस्विता कमी होते, असे मानले जाते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

FAQs

  1. ‘जीआरएस १९१५+१०५’ हे काय आहे? (What is 'GRS 1915+105'?)
    ‘जीआरएस १९१५+१०५’ हे एक कृष्णविवर आहे, ज्याच्या क्ष-किरण तेजस्वितेमध्ये बदल होत असल्याचे इस्रोच्या निरीक्षणांमधून समोर आले आहे.

  2. कृष्णविवराच्या प्रकाशाची तीव्रता का बदलते? (Why does the intensity of light from the black hole change?)
    कृष्णविवराच्या कडांवर असलेल्या कोरोनामध्ये (प्लाझ्मा ढग) होणाऱ्या बदलांमुळे प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त होते. कोरोना छोटा व गरम असताना प्रकाश तीव्र असतो, तर तो मोठा व थंड झाला की तीव्रता कमी होते.

  3. या अभ्यासासाठी कोणती भारतीय वेधशाळा वापरण्यात आली? (Which Indian observatory was used for this study?)
    ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ ही भारतीय अवकाश वेधशाळा २०१५ पासून या कृष्णविवरावर लक्ष ठेवून आहे आणि तीच या अभ्यासासाठी वापरण्यात आली.

  4. या निरीक्षणांचा काय उपयोग होणार आहे? (What is the significance of these observations?)
    या निरीक्षणांमुळे कृष्णविवराच्या आजूबाजूच्या परिस्थिती आणि त्यांच्या वर्तनातील बदल समजून घेण्यास मदत होणार आहे. हे अभ्यास कृष्णविवरातील गूढ उकलण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: पहलगामच्या आकांचा खात्मा कसा केला? अमित शहांनी लोकसभेत वेळ ठिकाण संपूर्ण ऑपरेशन सांगितलं

TCS Recruitment: टीसीएसने कर्मचारी कपातीनंतर आता वेतनवाढ अन् भरतीही थांबवली; IT क्षेत्राचं भविष्य अंधारात?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर माध्यमांमध्ये केलेला तमाशा, प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका, सरकारला प्रश्नांनी घेरले

Latest Maharashtra News Updates: पहलगाम हल्ल्यात सहभागी 3 दहशतवादी ठार; अमित शहांनी दिली माहिती

ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत दिग्गजांना डावललं, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; माजी केंद्रीय मंत्र्याने म्हटलं, भारतात राहतो...

SCROLL FOR NEXT