Technocrat N R Narayan Murthy 
देश

भारतीय मानसिकतेत स्थित्यंतर हवे ः मूर्ती

निवारा, पोषणमूल्यांचा प्रश्न अधिक गंभीर

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - पोषणमूल्ये आणि निवाऱ्यासारख्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यापासून भारत आणखी कोसो दूर असून त्यासाठी भारतीय मानसिकतेमध्ये मोठे सांस्कृतिक स्थित्यंतर घडवून आणणे गरजेचे असल्याचे मत आघाडीचे टेक्नोक्रॅट एन. आर. नारायणमूर्ती यांनी मांडले. ते येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इन्फोसिस सायन्स फाउंडेशन’च्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सध्या भारताला भेडसावणाऱ्या या सर्वांत मोठ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन योद्धे तैनात करावे लागतील, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

मूर्ती म्हणाले, ‘‘आपला देश वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे. आपण अंतराळामध्ये रॉकेट आणि उपग्रहे देखील पाठविली. आपण पोलाद, ऊर्जा प्रकल्पाबरोबरच मोठी धरणे देखील उभारली आहेत. आपण कोरोना प्रतिबंधक लस देखील तयार केली. ह्रदय आणि मूत्राशयाच्या प्रत्यारोपणामध्ये आपल्याला मोठे यश आले आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, पोषणमूल्ये आणि निवाऱ्यासारख्या १.४ अब्ज भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यापासून मात्र अद्याप आपण कोसो दूर आहोत.’’

मानवी मनाची क्षमता मोठी

मानवी मनाच्या क्षमतेशिवाय कोणत्याही देशाने गरिबी, आरोग्य, पोषणमूल्यांसारख्या समस्यांचे निराकरण केलेले दिसत नाही. याशिवाय त्यांना आर्थिक संपन्नता देखील मिळविता आलेली नाही असे सांगतानाच मूर्ती यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष थिऑडोर रूझवेल्ट यांच्या विधानाचा दाखला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT