Mayawati-Anand-kumar 
देश

मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त; आयकर विभागाने केली कारवाई

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान आनंद कुमार यांची नोएडामध्ये 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याची माहिती पुढे आली. सध्याच्या बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत जवळपास 400 कोटी रुपये इतकी आहे. 

ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून तो जप्त करण्याबाबतचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या अनेक बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपत्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे बसप प्रमुख मायावती गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे.

कोण आहेत आनंद कुमार?
आनंद कुमार हे मायावती यांचे भाऊ आहेत. ते नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लार्कपदी काम करीत होता. मात्र, मायावती सत्तेमध्ये येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ होण्यास सुरवात झाली. कुमार यांच्यावर बनावट कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एकामागून एक अशा एकूण 49 कंपनी सुरू केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google चा मोठा धमाका! आता YouTube-Instagram वरचा तुमचा प्रत्येक Video-Post लाखो लोकांना दिसणार? क्रिएटर्ससाठी आली गेमचेंजर सुविधा

IND vs AFG: रिषभ पंतला कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर गौतम गंभीरची वॉर्निंग; म्हणाला, 'त्याने बदलण्याची गरज नाही, पण...'

लव्ह मॅरेज करतेयस जर काही चुकीचं झालं तर... लग्नाच्या एक दिवस आधी प्रिया बापटला आई असं काही म्हणालेली की

Latest Marathi News Live Update : AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

IND vs AFG: आयपीएलच्या रात्रींपासून कसोटीच्या सकाळीपर्यंत; भारतीय खेळाडूंचे ‘जैविक घड्याळ’ बदलण्याची धडपड

SCROLL FOR NEXT