Deepfake Esakal
देश

Deepfake: डीपफेक व्हिडिओंबाबत सरकार अ‍ॅक्शन मोडवर; अश्विनी वैष्णव यांचा कंपन्यांना गंभीर इशारा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबधित कंपन्यांना इशारा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

डीपडेक व्हिडिओंची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबधित कंपन्यांना इशारा दिला आहे. डीपडेक व्हिडिओंची वाढती प्रकरणे लक्षात घेता अश्विनी वैष्णव यांनी सरकारी अधिकारी आणि प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्यात येत्या 3 ते 4 दिवसांत बैठक होणार असल्याचे सांगितले आहे.

या बैठकीत सर्वजण डीपफेक व्हिडिओचे नियम आणि ते कसे नियंत्रित केले जाऊ शकतात यावर चर्चा करतील. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म पुरेसे उपाय करण्यात अयशस्वी झाल्यास सेफ हार्बरची सुरक्षा कवच रद्द केली जाईल. याचा अर्थ सोशल मीडिया कंपन्यांना दिलेली सूट रद्द केली जाईल.(Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारने सर्व मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून व्यासपीठावरील डीपफेक व्हिडिओवर कारवाई करण्यास आणि ते काढून टाकण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.

कंपन्यांनी नोटीसला उत्तर दिले असून प्रत्येकजण त्यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.अलीकडेच पीएम मोदींनीही एआयच्या गैरवापरावर भाष्य केलं होतं आणि मीडिया संस्थांना त्याबद्दल लोकांना जागरूक करण्यास सांगितले होते. ते म्हणाले की सरकार एआयवर कायदा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि या विषयावर ओपन एआयशीही चर्चा सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

या बैठकीत गुगल आणि मेटा सारख्या मोठ्या कंपन्या सहभागी होणार

अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने पाठवलेल्या नोटीसवर कंपन्या कारवाई करत आहेत. परंतु आम्हाला वाटते की अजून बरीच पावले उचलावी लागतील आणि आम्ही लवकरच सर्व व्यासपीठांची बैठक घेणार आहोत… कदाचित येत्या ३-४ दिवसांत सरकार बैठक घेईल. या बैठकीत सर्व कल्पनांवर विचार केले जाईल आणि एआयचा गैरवापर कसा कमी करता येईल यावर चर्चा केली जाईल. AI मानवांसाठी कसे फायदेशीर ठरू शकते यावरही चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT