PM Modi:  
देश

PM Modi: राजस्थानमधील महिलांवरील अत्याचार पाहून वेदना होतात; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या चित्तोडगड येथे सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमधील गुन्ह्यांच्या घटनांमुळे मला वेदना होतात. गेल्या पाच वर्षात काँग्रेसने राज्याला संपवले असं ते म्हणाले.

गुन्हेगारीमध्ये राज्य प्रथम असल्याच्या मला वेदना होतात. गुन्हेगारीत राज्य अव्वल आहे. दंगल होण्यामध्ये राज्य पहिला आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये राज्य पहिला आहे. महिलांवरील आणि दलितांवरील अॅट्रोसिटीसाठी राज्याचे नाव कुख्यात आहे. यासाठीच तुम्ही काँग्रेसला निवडून दिला होता का? असा सवाल मोदींनी जनतेला विचारला. (PM Modi turns emotional attacks Congress in Chittorgarh rally)

राज्यातील अवस्थेबाबत बोलताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वाधिक राजस्थानमध्ये घडतात, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव स्विकारला आहे. सत्तेत आल्यास विकासाला प्राधान्य दिले जाईल. तसेत काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कारवाई केली जाईल.

पंतप्रधान मोदी यांनी राज्यात विविध विकास कामांचा शुभारंभ केला. त्यांनी सकाळी चित्तोडगडमध्ये जवळपास ७००० कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन केले. भाजप राजस्थानमध्ये महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी इंडिया आघाडीवर टीका केली. त्यांना महिलांना न्याय द्यायचा नाही. केवळ ते दिखावा करत आहेत, असं ते म्हणाले.

येत्या काही महिन्यांत पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT