Jagdeep Dhankhar and Amit Shah Sakal
देश

धनकर दिल्लीतच; शहांना पुन्हा भेटणार

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी बहुचर्चित दिल्ली दौरा लांबविला असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ते पुन्हा भेटणार असल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) यांनी बहुचर्चित दिल्ली (Delhi) दौरा लांबविला असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Amit Shah) यांना ते पुन्हा भेटणार असल्याची दाट शक्यता आहे. ही बैठक शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे. (Dhankar Meet to Amit Shah Politics)

गुरुवारी धनकर यांनी शहा यांची भेट घेतली. तेव्हाचे छायाचित्र त्यांनी ट्विट केले. ते दिल्लीहून शुक्रवारी पश्चिम बंगालला परतणार होते, पण त्यांनी प्रयाण लांबणीवर टाकले. आता ते शनिवारी परतण्याची शक्यता आहे.

धनकर यांनी या बैठकीत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शहा यांना माहिती दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत.

धनकर मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. हा दौरा घटनात्मक शिष्टचारांचा भंग करणारा असल्याचा त्यांचा दावा आहे. निवडणुकीदरम्यान हिंसाचार उसळलेल्या ठिकाणी धनकर यांनी दौरे केल्यामुळे ममता संतापल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT