Karnataka Legislative Session esakal
देश

कर्नाटक विधानसभेत भाजपच्या 'जय श्रीराम'ला काँग्रेस आमदारांनी दिलं 'जय भीम'च्या घोषणेनं उत्तर

विधानसभेत भाजपच्या सदस्यांनी भगवा शाली परिधान केला असला तरी धजदच्या सदस्यांनी भगव्यापासून अंतर राखल्याचे दिसून आले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपालांनी (Governor Thawar Chand Gehlot) जय हिंद, जय कर्नाटक, धन्यवाद म्हणताच भाजप सदस्यांनी ‘जय श्री राम’चा जयघोष केला.

बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत त्यांचे भाषण संपत असतानाच भाजप आमदारांनी ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram) आणि काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLA) ‘जय भीम’चा (Jai Bheem) घोषणा केल्याची घटना घडली. भाजप आमदारांनी (BJP MLA) भगवी शाल परिधान करून अधिवेशनात सहभाग घेतला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी सभागृहाला संबोधित केले. राज्यपालांनी (Governor Thawar Chand Gehlot) जय हिंद, जय कर्नाटक, धन्यवाद म्हणताच भाजप सदस्यांनी ‘जय श्री राम’चा जयघोष केला. दरम्यान, राष्ट्रगीत वाजवण्यात आले. एनडीए आघाडीतील धजद सदस्य कोणतीही घोषणा न करता तटस्थ राहिले.

विधानसभेत भाजपच्या सदस्यांनी भगवा शाली परिधान केला असला तरी धजदच्या सदस्यांनी भगव्यापासून अंतर राखल्याचे दिसून आले. तत्पूर्वी, विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आलेले राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले.

राजभवन येथून विशेष वाहनाने आगमन झाल्यावर त्यांना शिष्टाचारानुसार आमदार निवासाच्या प्रवेशद्वारावर ताफ्याने आणले. विधानसौधसमोर आल्यानंतर राज्यपालांचे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

SCROLL FOR NEXT