जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल Sakal
देश

आधी सावरकरांचे लिखाण वाचा मगच बोला - मान्यवरांचा सूर

जयपूर येथे सुरू असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आज सकाळपासून विविध विषयांवर चर्चासत्र पार पडली.

आशिष तागडे

जयपूर : वीर सावरकर यांनी हिंदुत्वाबाबत कोणतेही ध्रुवीकरण केले नाही. त्यांनी याबाबत घेतलेली भूमिका आणि त्यावरील त्यांचे साहित्य वाचा. नंतरच बोलले पाहिजे, असा सल्ला आज देण्यात आला.

जयपूर येथे सुरू असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आज सकाळपासून विविध विषयांवर चर्चासत्र पार पडली. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर होत असलेल्या या फेस्टिव्हलसाठी देश-विदेशातील विविध मान्यवर लेखक, माध्यमकर्मी सहभागी झाले आहेत. ऑफलाइनप्रमाणेच ऑनलाइनही हा फेस्टिव्हल सुरू आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी याला ‘प्युअर इव्हिल ः द बॅड मॅन ऑफ बॉलिवूड’ या विषयावर बोलते केले. या चर्चासत्रात बालाजी विठ्ठलही सहभागी झाले होते. फेस्टिव्हलमध्ये ‘वीर सावरकर ः लाइफ अँड लिगसी’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. यामध्ये ज्येष्ठ लेखक उदय माहूरकर, मकरंद परांजपे सहभागी झाले होते. सावरकरांनी हिंदुत्वाचे ध्रुवीकरण केले नाही, असे स्पष्ट करत माहूरकर म्हणाले, ‘‘सावरकर ‘फादर ऑफ नॅशनल सिक्युरिटी’ होते. त्यांनी प्रथमपासून देशाच्या सुरक्षेची भूमिका मांडली. धर्म आणि जातीच्या पलीकडे त्यांनी मांडणी केली असून ती समजून घेतली पाहिजे. चीनबाबत त्यांनी धोका असल्याचे सर्वांत प्रथम सांगितले होते. सावरकरांच्या हिंदुत्वात सर्वांना समान अधिकार आहेत.’’

सावरकरांचे लेखन व्यवस्थित वाचून नंतरच त्याबाबत बोलले पाहिजे, असे परांजपे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सावरकरांनी समानतेचा आग्रह धरला होता. याकडे दुर्लक्ष केले जाते. देशाची सीमा अधिक सुरक्षित करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. सावरकर ध्रुवीकरण करणारे नव्हे तर एकत्रीकरण करणारे होते. त्यांची विचारधारा योग्य प्रकारे समजून घेतली पाहिजे.’’

दरम्यान, एपिक वुमन्स या विषयावर झालेल्या चर्चासत्रात कोरल दासगुप्ता, इरा मुखर्जी, आनंद नीलाकांतन आदी सहभागी झाले होते. या चर्चासत्रात रामायण, महाभारत आणि वेद काळातील महिलांचे स्थान आणि त्यांची भूमिका यावर चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT