

Raj Thackeray Targets PM Modi
Esakal
मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषणातून पंतप्रधान मोदींना विद्यार्थी आंदोलनावरून सवाल केला. शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना चुकीचं म्हणणारे पंतप्रधान त्यांच्या पक्षाच्या समर्थकांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर बोलणार का असं राज ठाकरेंनी विचारलं. पंतप्रधान मोदी त्यांच्या आईबाबत वापरलेल्या भाषेवर बोलतात, दुसऱ्यांनाही आया असतात हे तुमच्या लोकांना सांगा असंही राज ठाकरे म्हणाले.