Rahul Gandhi 
देश

भारत जोडो यात्रा 2024 लोकसभा निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरणार; जयराम रमेश यांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेसची ही यात्रा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरणार असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सध्या भारत जोडो यात्रा कर्नाटक राज्यात आहे. (Congress news in Marathi)

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, ही यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करेल. आमचा भर लोकांपर्यंत पोहोचण्यावर आहे, ही यात्रा निवडणुकीच्या उद्देशाने सुरू केलेली नाही, मात्र यातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची पायाभरणी होणार आहे. मात्र आम्ही यात्रेची लय कशी राखू शकतो आणि संरचनात्मक सुधारणा कशा घडवून आणू शकतो हे सर्वात मोठे आव्हान आहे. पुढील काही दिवसांत यावर काम केले जाईल. त्याचबरोबर पक्षातील उणिवा दूर करू, असंही रमेश यांनी नमूद केलं.

पुढील काळात कोणत्या मुद्दावर काँग्रेस भर देणार हे विचारले असता, रमेश म्हणाले की, ते राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि राजकीय केंद्रीकरणाचे मुद्दे पुढे करणार आहेत. आरएसएस नेते दत्तात्रेय होसाबळे यांनीही अलीकडेच आर्थिक विषमतेबद्दल बोलले आहे आणि भाजपला हे सत्य स्वीकारावे लागेल. महागाई, देशातील गरिबीत झालेली वाढ आणि राजकीय केंद्रीकरणातून घटनात्मक संस्थांचे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर आम्ही भर देणार असल्याचं रमेश यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान आमच्या भारत जोडो यात्रेला भाजप जनसंकल्प कार्यक्रमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जेव्हा विकासकामं आणि सरकारच्या विधायक कामांचा प्रश्न येतो, तेव्हा दाखवण्यासारखे काहीच नाही. काँग्रेसविरोधात नकारात्मक प्रचार करणे हे एकमेव हत्यार भाजप वापरत असल्याचा दावा रमेश यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT