देश

मोदी केवळ फेकू मास्टरच नाही तर 'यू टर्न' उस्तादही; व्हिडीओ रिट्विट करत काँग्रेसची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एनएफएसएवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. एनएफएसए कसा फायदेशीर आहे, हे सांगणारे प्रतिज्ञापत्र भाजपप्रणित केंद्र सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टात दिले आहे. त्यावरून रमेश यांनी मोदींवर सडकून टीका केली. (jairam ramesh says pm modi not only feku master but uturn master )

नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एनएफएसएची खिल्ली उडवली होते. यावरून रमेश यांनी मोदींचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की, मोदी हे केवळ फेकू मास्टरच नाहीत तर यू टर्न उस्तादही आहेत. याआधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अर्थहीन म्हणण्यास ते थकत नसत. मात्र आता ते सर्वोच्च न्यायालयाला कायद्याचं महत्त्व सांगत आहेत.

एनएफएसएवरून विधेयकामुळे गरिबांमध्ये उपासमारीची समस्या वाढणार आहे. या विधेयकातून दारिद्र्यरेषेखालील जगणाऱ्या लोकांचा घास कमी होईल, असंही मोदी व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

भारतातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढून ३३.४ टक्के झाले आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. २०१३ मध्ये एनएफएसए सुरू झाल्यानंतर ही वाढ झाली. यासह अनेक कुटुंबे उच्च उत्पन्न वर्गात दाखल झाली आहेत. असे लोक आता २०१३-१२ च्या तुलनेत गरीब राहिलेले नाहीत, असे केंद्राचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 'जबरा फॅन' बनली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली- अनेकदा प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

Career Numerology: IT, कोडिंग ते रिसर्च; अंकशास्त्रानुसार 'या' ४ मूलांकाच्या लोकांना मिळते परदेशात नोकरी!

SCROLL FOR NEXT