Crime News Esakal
देश

Crime News: आधी ओशोंचं प्रवचन ऐकून इन्स्टावर ठेवलं स्टेट्स; मग दोन मित्रांनी संपवलं जीवन

Crime News: टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी चिता, अंत्ययात्रा असे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. दोन्ही मित्रांनी ओशो यांचे प्रवचनही ऐकले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादाक बातमी समोर आली आहे. यूपीतील जालौनमध्ये दोन मित्रांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी ओशो यांचे प्रवचन ऐकले होते. त्यांच्यावर ओशोंचा खूप प्रभाव होता. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी चिता, अंत्ययात्रा असे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. सध्या दोघांच्या मृत्यूची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण जालौनच्या काल्पी कोतवाली भागातील आहे, जिथे अमन वर्मा आणि बालेंद्र पाल नावाच्या दोन मित्रांनी काल एका निर्जन ठिकाणी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत बालेंद्रचा जागीच मृत्यू झाला, तर अमनची प्रकृती बिघडू लागली म्हणून त्यानी कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली.

त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही तातडीने उपचारासाठी काल्पी येथील आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अमनचा मृत्यू झाला. त्याचवेळी बालेंद्रला मृत आणण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अमन आणि बालेंद्र यांची घट्ट मैत्री असल्याचे तपासात उघड झाले. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि त्याचे लग्न झाले होते. तर बालेंद्रचे लग्न झाले नव्हते.

दोघेही ओशोंचे प्रवचन ऐकत असत आणि त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव होता. आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर तीन स्टेटस पोस्ट केले होते, ज्यावरून ते मृत्यूपूर्वी ओशोंचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसून आले. विष प्राशन करण्यापूर्वी बालेंद्रने आपल्या फोनवर पोस्ट केलेल्या स्टेटसमध्ये चिता, अंत्ययात्रा आणि ओशोंचे फोटो होते. फोटोमध्ये 'मृत्यू हे सत्य आहे' असे लिहिले होते.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघांनी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याप्रकरणी एसपी असीम चौधरी म्हणाले की, काल्पी कोतवाली भागात दोन मित्रांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT