Jallikattu
Jallikattu esakal
देश

Jallikattu : बैल आणि माणसांमध्ये खेळला जाणारा मृत्यूचा क्रूर खेळ जल्लीकट्टू म्हणजे काय?

सकाळ डिजिटल टीम

Jallikattu : तमिळनाडूमध्ये पोंगलच्या दिवशी होणाऱ्या जल्लीकट्टू या खेळाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने खेळाला परवानगी दिली आहे. तामिळनाडू सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने बैलांसोबत कोणतीही क्रूरता केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, पण हे देखील प्रत्येकाच्या मनात येते की जर बैलांचा जल्लीकट्टू हा खेळ धोकादायक असेल तर तो का खेळला जातो आणि त्याचे पारंपारिक श्रद्धा आणि नियम काय आहेत, चला जाणून घेऊया...

जल्लीकट्टू म्हणजे काय

जल्लीकट्टू खेळाला पूर्वी येरुथाझुवुथल म्हणत. जल्लीकट्टू हा तामिळनाडूमध्ये पोंगल या शुभ सणावर साजरा केला जातो. हा खेळ सुमारे 2500 वर्षांपूर्वी सुरू झाला आणि हा एक अभिमान आणि संस्कृतीचा सण मानला जातो. जल्लीकट्टू हा शब्द जल्ली आणि कट्टू या दोन तमिळ शब्दांपासून बनला आहे. जली म्हणजे नाणे आणि कट्टूला बैलाचे शिंग म्हणतात.

वास्तविक, हा सण साजरा करण्यामागचे आणखी एक कारण असे सांगितले जाते की, पोंगल हा सण पिकांच्या कापणीशी निगडीत आहे आणि पिकामध्ये बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून ते जतन करण्याची भावना निर्माण करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. असे खेळ अनेक राज्यात खेळले जातात जसे की महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत.

या खेळात आणखी एक गोष्ट खूप लोकप्रिय आहे आणि ती म्हणजे मंजू विराटु... म्हणजे बैलाचा पाठलाग. जल्लीकट्टू हा खेळ तामिळनाडूत लोकप्रिय आहे. ज्याला येरुथाझुवुथल, मधु पिडिथल आणि पोलारुधु पिडिथल अशी अनेक नावे आहेत.

सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये बंदी घातली होती

2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने या खेळावर बंदी घातली होती. यानंतर तामिळनाडूमध्ये हा खेळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने अध्यादेश आणून या खेळाला पुन्हा परवानगी दिली. मात्र या अध्यादेशालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

जुना जल्लीकट्टू आणि नवीन जल्लीकट्टू

जल्लीकट्टू हा तामिळनाडूचा राज्य खेळ आहे. या खेळात बैलाचा पाठलाग केला जातो. पोंगल सणादरम्यान या खेळाचे आयोजन केले जाते. मदुराईजवळ एक या खेळाचे खूप जुने चित्र सापडले होते.

यात एक माणूस बैलाला वश करताना दिसतोय. संगम साहित्यातही जल्लीकट्टूचा उल्लेख आढळतो. पण जल्लुकट्टू हल्ली काही वर्षांपूर्वी सुरू झाल्याचं मानलं जातं. हा खेळ इतका क्रूर नव्हता असेही म्हणतात. पण जेव्हा बैलांवर सट्टेबाजी सुरू झाली तेव्हापासून हा खेळ आणखीनच क्रूर होऊ लागला.

या खेळाचे नियम काय आहेत?

या खेळातील स्पर्धकाला एका वेळी बैलाचे वाशिंड पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो. बैलाला नियंत्रणात आणण्यासाठी त्याची शेपटी आणि शिंगे पकडली जातात. आणि बैलालाही लांब दोरीने बांधलेले असते. पण जिंकण्यासाठी वेळेच्या मर्यादेत बैल नियंत्रित करावा लागतो. एकंदरीत बैलाला वश करणं असा हा खेळ आहे.

सट्टा बाजार

पूर्वीच्या काळी बैलाच्या शिंगावर पैशाने भरलेली पिशवी बांधली जायची. जिंकणाऱ्याला ही पिशवी दिली जायची. मात्र आता हा खेळ केवळ पिशवी पुरता मर्यादित नसून आजकाल बैलावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो.

जल्लीकट्टू बैल

जल्लीकट्टू खेळातील बैल विलक्षण असतात. ते कंगयाम जातीचे असून, बैलांची ही जात अत्यंत लढाऊ असते. हे बैल सामान्य जातीपेक्षा मजबूत असतात. थोड्याशा चिथावणीवर हे बैल हल्ला करू शकतात. जल्लीकट्टूमध्ये लोकप्रिय असलेली दुसरी जात म्हणजे बांगूर बैल. हे बैल त्यांच्या वेगासाठी ओळखले जातात. जल्लीकट्टू खेळात सामील झालेल्या बैलांना खूप चांगला खुराक दिला जातो. एका अंदाजानुसार 1990 मध्ये कंग्यायम बैलांची संख्या 10 लाखांवर होती. आता तर फक्त 15,000 बैल शिल्लक आहेत.

पेटाचं म्हणणं काय आहे?

खरं तर, काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूदरम्यान एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, खेळापूर्वी बैलांना दारू पाजली गेली आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे ते भान न ठेवता उन्मत्तपणे धावतात. या दाव्यानंतर, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने या खेळाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पेटा आणि इतर अनेक प्राणी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हा खेळ क्रूर तर आहेच पण यात बैलांना दारू पाजली जाते. आणि चिथावणी देण्यासाठी त्यांच्या डोळ्यांवर मिरची चोळली जाते. त्यांना काबूत ठेवण्यासाठी त्यांची शेपूट पकडली जाते. यातून त्यांना वेदना दिल्या जातात. त्यांना आखाड्यात जाण्यासाठी चिथावणी देण्यासाठी इतरही अनेक क्रूर कृत्ये केली जातात.

तामिळनाडू जल्लीकट्टू फेडरेशन

तामिळनाडू जल्लीकट्टू फेडरेशनचे म्हणणे आहे की तामिळनाडू जल्लीकट्टू फेडरेशन या खेळावर बंदी आणण्याच्या विरोधात आहेत. पण खेळादरम्यान बैलांना इजा पोहोचवली जाऊ नये यावर त्यांचं एकमत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT