Two terrorists eliminated by Indian Army Esakal
देश

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

Jammu and Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. यात २ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Vrushal Karmarkar

जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. ज्यामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी जिल्ह्यातील गुंड भागात बोगद्याच्या बांधकामावर काम करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कॅम्पवरील कामगारांवर गोळीबार केला. दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी अशीच घटना घडवली होती. जिथे एका बिगर काश्मिरी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गंदरबलमध्ये दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरी मजुरांची हत्या करून या घटनेला अवघे 48 तास उलटले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी गगनगीरमध्ये जम्मू-काश्मीर नसलेल्या रहिवाशांवर हल्ला केला ज्यात 3 मजूर ठार झाले आणि 2 इतर जखमी झाले. सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी करून दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सोनमर्ग परिसरातील गगनगीर येथे स्थानिक नसलेल्या मजुरांवर भ्याड हल्ल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. हे कामगार परिसरातील एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. या दहशतवादी हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2-3 जण जखमी झाले आहेत. मी निशस्त्र आणि निष्पाप लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

जेपीसीसी प्रमुख तारिक कारा यांनीही बिगर स्थानिक मजुरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी या घटनेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनांमुळे वातावरण बिघडते आणि निरपराध मजुरांवर होणारे असे क्रूर हल्ले थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले. कारा यांनी शोकसंतप्त कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT