kashmir 
देश

काश्मिरमधील शाळा आज सुरु होणार; 'रेंज' नाहीच

वृत्तसंस्था

श्रीनगर : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत असून, आजपासून (सोमवार) काश्मिर खोऱ्यातील शाळा पूर्ववत सुरु होणार आहेत. 

काश्‍मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हळूहळू माघारी घेतले जातील असे मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी जाहीर केले होते. जम्मू आणि काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम सरकारने रद्द केल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सुरक्षा दलांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमधील टू- जी इंटरनेट सेवा रविवारी पुन्हा बंद केली, अफवा आणि फेक न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राज्यामध्ये अफवा पसरू नयेत आणि शांतता कायम राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

श्रीनगरमधील सुमारे 190 शाळा आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT