Jammu and Kashmir esakal
देश

Jammu and Kashmir: दहशतवादी हल्ल्यांत ITBP जवानाच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या या दोन हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन बालकांचा समावेश आहे.(Jammu and Kashmir Rajouri Six killed including ITBP jawan's toddler in terror attacks)

दहशतवाद्यांनी राजौरीतील डांगरी गावात रविवारी सायंकाळी तीन घरांवर गोळीबार केला होता. त्यात चार नागरिकांचा मृत्यू, तर सहाजण जखमी झाले होते. तर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. त्यात सान्वी शर्मा (७) आणि विहानकुमार शर्मा (४) या बहिण-भावाचा त्यात मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले.

तसेच, सुट्टीवर घरी आलेला आयटीबीपी जवान सुशील कुमार रविवारी संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा भाऊ दीपक (मामाचा मुलगा) गमावला. तर काही तासांनंतर, सकाळी झालेल्या आयईडी स्फोटात चार वर्षांचा मुलगा विहानचाही मृत्यू झाला. एकाच वेळी झालेल्या दुहेरी धक्क्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुर्चीखाली पडलेल्या पोत्यात आयईडी लपवून ठेवला होता हे कोणालाच माहीत नव्हते. सकाळी सुरक्षा दल, प्रसारमाध्यमे आणि इतरही त्यातून गेले. चार वर्षांचा विहान या खुर्चीवर खेळताना दिसला.

जेव्हा सुरक्षा दल आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी तेथून धनगरी चौकाकडे निघाले असता, मागून झालेल्या जोरदार स्फोटात विहान जागीच ठार झाला. दहा जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान सुमिक्षा हिचाही मृत्यू झाला.

राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आणि वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली.

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी असल्याची प्रतिक्रिया डांगरीचे सरपंच दीपक कुमार यांनी व्यक्त केली. या हल्ल्यांमुळे अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना येथे सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT