जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवादी हल्ल्या झाल्याची माहिती कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यामध्ये फरीदा खान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. परिसरात लष्कर तैनात करण्यात आलंय. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या हल्लात किती दहशतवाद्यांचा समावेश होता. याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दहशतवादी अजूनही या भागात लपून बसले असण्याची शक्यता आहे. सुरक्षादलांनी परिसराला घेरलं असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांनी म्युन्सिपल ऑफिसवर केलेल्या या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शाफत अहमद आणि रियाझ अहमद यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यात उत्तर काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलिस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला केला होता. पोलिस स्टेशनवर झालेल्या या हल्लात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या हल्लानंतर सुरक्षादलाने परिसराची घेराबंदी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.